नागपूर-सेवाग्राम थर्ड आणि चौथ्या लाईनसाठी २४५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:10 AM2019-07-11T00:10:35+5:302019-07-11T00:11:52+5:30

२०१९-२० च्या अर्थसंकल्पानंतर रेल्वेने जारी केलेल्या पिंक बुकमध्ये मध्य रेल्वेच्या नागपूर विभागासाठी अनेक महत्त्वाच्या कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. यानुसार नागपूर-सेवाग्राम थर्ड लाईनसाठी ११० कोटी रुपये आणि चौथ्या लाईनसाठी १३५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दोन्ही लाईन मिळून २४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे या कामांना आता गती मिळणार आहे. याशिवाय बडनेरा येथील वॅगन रिपेअर डेपोसाठी १५१.६३ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे मालगाड्यांचे डबे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

245 crores for Nagpur-Sevagram third and fourth line | नागपूर-सेवाग्राम थर्ड आणि चौथ्या लाईनसाठी २४५ कोटी

नागपूर-सेवाग्राम थर्ड आणि चौथ्या लाईनसाठी २४५ कोटी

Next
ठळक मुद्देनागपूर-अजनी यार्डातील कामांना गती : बडनेरा वॅगन रिपेअर डेपोसाठी १५१.६३ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१९-२० च्या अर्थसंकल्पानंतररेल्वेने जारी केलेल्या पिंक बुकमध्ये मध्य रेल्वेच्यानागपूर विभागासाठी अनेक महत्त्वाच्या कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. यानुसार नागपूर-सेवाग्राम थर्ड लाईनसाठी ११० कोटी रुपये आणि चौथ्या लाईनसाठी १३५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दोन्ही लाईन मिळून २४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे या कामांना आता गती मिळणार आहे. याशिवाय बडनेरा येथील वॅगन रिपेअर डेपोसाठी १५१.६३ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे मालगाड्यांचे डबे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
अर्थसंकल्पात विदर्भातील अनेक रेल्वे योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मध्य रेल्वे नागपूर विभागातील तिगाव- चिचोंडा थर्ड लाईन(१६.५३ किलोमीटर)साठी ३५ कोटी रुपये, वर्धा-बल्लारशाह(१३२ किलोमीटर)साठी १६० कोटी रुपये, अमरावती- नरखेड(१३८ किलोमीटर)साठी ९० लाख रुपये आणि इटारसी-नागपूर डबलिंग(२८० किलोमीटर)साठी १८५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पिंक बुकमध्ये विविध रेल्वेस्थानक, रेल्वे सेक्शनमध्ये लुप लाईनला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ही व्यवस्था रेल्वेगाड्यांचा वेग व सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यक आहे. यात इटारसी-आमला-नागपूर-वर्धा-भुसावळ-जळगाव लुप लाईनसाठी (७.१३.८६ किलोमीटर) ५७.५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागपूर विभागात ठिकठिकाणी रेल्वे ओव्हरब्रिज, रेल्वे अंडरब्रिजची निर्मिती करण्यात येणार आहे.
चेंगराचेंगरीची स्थिती टाळण्यासाठी फूट ओव्हरब्रिज
रेल्वेने जारी केलेल्या पिंक बुकमध्ये नागपूर रेल्वेस्थानकावर इटारसी एण्डकडील भागात प्लॅटफार्म क्रमांक १ ते ८ दरम्यानच्या फूट ओव्हरब्रिजसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत नागपूर रेल्वेस्थानकावर इटारसी एण्डकडील भागात असलेला फूट ओव्हरब्रिज अतिशय अरुंद आहे. तर मुंबई एण्डकडील भागातील फूट ओव्हरब्रिजवरही नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते. अनेकदा या फूट ओव्हरब्रिजवर प्रवाशांना दाटीवाटीने मार्ग काढत जावे लागते. मुंबईत फूट ओव्हरब्रिज कोसळून प्रवासी मोठ्या प्रमाणात मृत्यू पावल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर नव्या फूट ओव्हरब्रिजची मागणी समोर आली होती. आता या कामासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा फूट ओव्हरब्रिज तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, भविष्यात प्रवाशांच्या चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता उरणार नाही.
रेल्वे गेटवरील अपघात होणार कमी
नागपूर विभागात रेल्वे क्रॉसिंग गेटवर अनेकदा अपघात होतात. यात अनेक नागरिक मृत्युमुखी पडतात. त्यामुळे या अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी नागपूर विभागात १५ लेव्हल क्रॉसिंग गेट तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात ८ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे गेट तयार झाल्यामुळे रेल्वे क्रॉसिंगवर अपघात कमी होतील. रेल्वे क्रॉसिंग गेटमुळे रेल्वेगाड्यांचा वेगही वाढण्यास मदत होणार आहे.
नागपूर, अजनी रेल्वेस्थानकासाठी तरतुदी

  • नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १, २, ३ च्या नुतनीकरणासाठी १ कोटी रुपये
  • अजनीत प्रस्तावित इलेक्ट्रिक लोको मेंन्टेनन्स डेपोसाठी २.६५ कोटी रुपये
  • अजनी इलेक्ट्रिक लोकोशेडला १७५ इंजिनवरून २०० इंजिन ठेवण्याच्या क्षमतेसाठी १.५० कोटी रुपये
  • नागपूर विभागात ७ केंद्रीकृत सिग्नलिंग ब्लॉक हटच्या नुतनीकरणासाठी ४ कोटी रुपये
  • वर्धा-नागपूर इंजिन लुपलाईनसाठी १ कोटी रुपये
  • नागपूर विभागात ५० क्रॉसिंग गेटवर रिमोट टर्मिनल व एलईडी इक्विपमेंटसाठी ४ कोटी रुपये
  • गोधनी-नागपूर-खापरी ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंगसाठी ६ कोटी रुपये

Web Title: 245 crores for Nagpur-Sevagram third and fourth line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.