नागपूरमार्गे धावणाऱ्या  २३ रेल्वेगाड्या धुक्यामुळे ‘लेट’, ३ रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 10:30 PM2018-01-03T22:30:04+5:302018-01-03T22:32:21+5:30

दिल्लीकडील भागात दाट धुके पसरल्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. बुधवारी २३ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा ३ ते १७ तास उशिराने धावल्या, तर ३ रेल्वेगाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रेल्वेगाड्यांची वाट पाहत प्रवाशांना वेटिंग रूममध्ये बसून राहण्याची पाळी आली.

23 trains running through Nagpur, 'Late', 3 canceled due to fog | नागपूरमार्गे धावणाऱ्या  २३ रेल्वेगाड्या धुक्यामुळे ‘लेट’, ३ रद्द

नागपूरमार्गे धावणाऱ्या  २३ रेल्वेगाड्या धुक्यामुळे ‘लेट’, ३ रद्द

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवाशांची गैरसोय : वेटिंग रूम फुल्ल

आॅनलाईन लोकमत
नागपूर : दिल्लीकडील भागात दाट धुके पसरल्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. बुधवारी २३ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा ३ ते १७ तास उशिराने धावल्या, तर ३ रेल्वेगाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रेल्वेगाड्यांची वाट पाहत प्रवाशांना वेटिंग रूममध्ये बसून राहण्याची पाळी आली.
बुधवारी रेल्वे प्रशासनाने २२८८५ लोकमान्य टिळक टर्मिनस-टाटानगर एक्स्प्रेस, ५१८२९ नागपूर-इटारसी एक्स्प्रेस आणि ५१२८६ नागपूर-भुसावळ या तीन गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर उशिराने येणाऱ्या  रेल्वेगाड्यात १२२७० निजामुद्दीन-चेन्नई एक्स्प्रेस १७ तास, १२४१९ निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस १६ तास, १८२३६ अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस १५.१५ तास, १२६५२ निजामुद्दीन-मदुराई ७ तास, २२४१६ निजामुद्दीन-विशाखापट्टणम ४.५० तास, १२८०८ हजरत निजामुद्दीन-विशाखापट्टणम स्वर्णजयंती एक्स्प्रेस ७ तास, १२५२१ बरौनी-एर्नाकुलम राप्तीसागर एक्स्प्रेस १५ तास, १२६२६ नवी दिल्ली-त्रिवेंद्रम ४.३० तास, १२१६० जबलपूर-अमरावती ४ तास, १६३१८ श्रीमाता वैष्णोदेवी कटरा-इरोड जंक्शन हिमसागर एक्स्प्रेस १४.३० तास, १२७२४ दिल्ली-हैदराबाद १३.३० तास, २२९६२ निजामुद्दीन-सिकंदराबाद ८ तास, १५०२३ गोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस ७.१५ तास, १२७९२ दानापूर-चेन्नई एक्स्प्रेस २.३० तास, १२६१६ दिल्ली-चेन्नई एक्स्प्रेस ९.४५ तास, १२४०९ रायगड-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस १० तास, १२६२२ दिल्ली-चेन्नई एक्स्प्रेस ४.३० तास, १६३६० पटना-एर्नाकुलम एक्स्प्रेस ६ तास, १२२९६ दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस ३ तास, १२५७७ बागमती-म्हैसूर एक्स्प्रेस ५.३० तास, १२५२५ त्रिवेंद्रम-दिल्ली एक्स्प्रेस २ तास, १२८०७ विशाखापट्टणम-निजामुद्दीन स्वर्णजयंती एक्स्प्रेस १.३० तास आणि १२८०४ हजरत निजामुद्दीन-विशाखापट्टणम २ तास या गाड्यांचा समावेश होता. उशिराने येणाऱ्या 
रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसून राहण्याची पाळी आली. यामुळे रेल्वे स्थानकावरील वेटिंग रूम फुल्ल झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात गर्दी
उशिराने येणाऱ्या  रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात गर्दी केली. यात अनेक प्रवाशांनी आपली गाडी येण्यास उशीर असल्यामुळे दुसऱ्या  गाडीने प्रवास करण्याची परवानगी उपस्टेशन व्यवस्थापकांकडून घेतली.

 

Web Title: 23 trains running through Nagpur, 'Late', 3 canceled due to fog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.