नवी दिल्लीच्या गणराज्य दिन परेडमध्ये नागपूर मनपाचे २१ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 10:27 PM2018-01-01T22:27:20+5:302018-01-01T22:30:59+5:30

नवी दिल्ली येथे होणाऱ्या गणराज्य दिन परेडसाठी नागपूर महापालिकेच्या चार शाळांतून २१ विद्यार्थी व एका शिक्षकाची निवड झाली आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थी व शिक्षकाला सोमवारी महापौर नंदा जिचकार व आयुक्त अश्विन मुदगल यांच्या हस्ते आवश्यक साहित्य वितरित करण्यात आले.

21 students of Nagpur Municipal Corporation in the Republic Day Parade | नवी दिल्लीच्या गणराज्य दिन परेडमध्ये नागपूर मनपाचे २१ विद्यार्थी

नवी दिल्लीच्या गणराज्य दिन परेडमध्ये नागपूर मनपाचे २१ विद्यार्थी

Next
ठळक मुद्देमहापौर व आयुक्तांनी केले कौतुक

आॅनलाईन लोकमत
नागपूर : नवी दिल्ली येथे होणाऱ्या गणराज्य दिन परेडसाठी नागपूर महापालिकेच्या चार शाळांतून २१ विद्यार्थी व एका शिक्षकाची निवड झाली आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थी व शिक्षकाला सोमवारी महापौर नंदा जिचकार व आयुक्त अश्विन मुदगल यांच्या हस्ते आवश्यक साहित्य वितरित करण्यात आले.
दक्षिण-मध्य सांस्कृतिक विभागामार्फत नागपुरातील २७ शाळांमधून १७४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात महापालिकेच्या चार शाळांमधून २१ विद्यार्थी व एक शिक्षकाची निवड करण्यात आली. सर्व विद्यार्थी २ जानेवारीला दुपारी १२.४५ ला गोंडवाना एक्स्प्रेसने दिल्लीला रवाना होतील व २८ जानेवारी रोजी परत येतील. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुहानी पाल, काजल गुप्ता, दीपक पाल, वाल्मिकीनगर शाळेची माधवी पांडे, काजल झा, खुशबू ठाकूर, बॅरिस्टर शेषराव वानखेडे शाळेची शुभांगी बोकडे, प्रथम सायम, गौरव सहारे, वैष्णवी केकारवाडे, शिवकुमार नेवारे, आस्था खंडारे, लालबहादूर शास्त्री शाळेचे आरती यादव, आयुषी शर्मा, अमिषा सिंग, रितेश शर्मा, श्रीकृष्णा लोढी, विनय रक्षक, इंद्रा मारवाडी, रितिक बिहा. हे सर्व विद्यार्थी नवव्या वर्गात आहे. तर कार्तिक कोहली हा आठव्या वर्गात आहे. लालबहादूर शास्त्री शाळेतील श्रीमती लता राजकुमार कनाथे या शिक्षिकेची निवड झाली आहे.
महापालिकेतर्फे या विद्यार्थ्यांना सुटकेस, एअर बॅग, लॅपटॉप बॅग, ट्रॅकसूट, कॅनवॉस जोडे, मोजे, ब्लेझर आदी आवश्यक वस्तू वितरित करण्यात आल्या. यावेळी महापौरांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असा सल्लाही दिला. यावेळी शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, क्रीडा समिती सदस्य शरद यादव, नगरसेवक पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त आर. झेड. सिद्दिकी, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, मुख्याध्यापक संजय पुंड उपस्थित होते.

Web Title: 21 students of Nagpur Municipal Corporation in the Republic Day Parade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.