२०२४ पर्यंत निर्देशांक एक लाखाचा टप्पा पार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 01:00 AM2018-07-06T01:00:20+5:302018-07-06T01:01:20+5:30

गेल्या ३६ वर्षांत शेअर बाजाराचा निर्देशांक आठ वर्षे चढला तर उर्वरित वर्षांत तो खाली आला. २०२४ पर्यंत निर्देशांक एक लाखाचा टप्पा पार करणार असल्याचे भाकीत किरण जाधव अ‍ॅन्ड असोसिएट्सचे व्यवस्थापकीय संचालक किरण जाधव यांनी ‘व्हिजन २०२४ आॅफ स्टॉक मार्केट’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात काढले.

By 2024, index will cross one lakh strata | २०२४ पर्यंत निर्देशांक एक लाखाचा टप्पा पार करणार

२०२४ पर्यंत निर्देशांक एक लाखाचा टप्पा पार करणार

Next
ठळक मुद्देकिरण जाधव अ‍ॅन्ड असोसिएट्सचे भाकीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या ३६ वर्षांत शेअर बाजाराचा निर्देशांक आठ वर्षे चढला तर उर्वरित वर्षांत तो खाली आला. २०२४ पर्यंत निर्देशांक एक लाखाचा टप्पा पार करणार असल्याचे भाकीत किरण जाधव अ‍ॅन्ड असोसिएट्सचे व्यवस्थापकीय संचालक किरण जाधव यांनी ‘व्हिजन २०२४ आॅफ स्टॉक मार्केट’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात काढले. यावेळी किरण जाधव अ‍ॅन्ड असोसिएट्सचे सेंट्रल रिजन हेड ज्ञानेश्वर बढे उपस्थित होते. चर्चासत्रात दोन हजारांपेक्षा जास्त गुंतवणूकदार उपस्थित होते. जाधव म्हणाले, १९८० ते २०१७ पर्यंत चलनवाढीचा दर ७.९४ टक्के होता. यादरम्यान सोन्यावर ९.२३ टक्के, बँक ठेवीवर ८.८३ टक्के आणि शेअर बाजारात १६.४ टक्के परतावा मिळाला. शेअर बाजाराने चांगला परतावा दिला म्हणून नव्हे तर गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात वाचून व समजून गुंतवणूक करावी. एकदा मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण समजल्यास शेअर बाजारात जास्तीत जास्त नफा कमविता येतो. लोकांनी गुंतवणुकीसंदर्भात भीती बाळगू नये. निर्देशांक जेव्हा चढतीवर असतो, तेव्हा शेअरची विक्री करणे योग्य ठरते. त्यानंतर मार्केट खाली येण्यास सुरुवात होते. २०१९ च्या निवडणुकीत काहीही घडो, पण शेअर बाजाराचा निर्देशांक उंचावेल, असा दावा त्यांनी केला.

Web Title: By 2024, index will cross one lakh strata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.