नागपुरात स्क्रब टायफसचे १८६ रुग्ण , २९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 01:19 AM2018-10-27T01:19:57+5:302018-10-27T01:20:40+5:30

तीन महिन्याचा कालावधी होत असतानाही स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. आतापर्यंत तब्बल १८६ रुग्णांची नोंद झाली असून २९ रुग्णांचे बळी गेले आहेत. एकट्या नागपूर जिल्ह्यात ८८ रुग्ण आढळून आले आहेत.

186 patients of Scrab Typhus, 29 deaths in Nagpur | नागपुरात स्क्रब टायफसचे १८६ रुग्ण , २९ जणांचा मृत्यू

नागपुरात स्क्रब टायफसचे १८६ रुग्ण , २९ जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात ८८ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन महिन्याचा कालावधी होत असतानाही स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. आतापर्यंत तब्बल १८६ रुग्णांची नोंद झाली असून २९ रुग्णांचे बळी गेले आहेत. एकट्या नागपूर जिल्ह्यात ८८ रुग्ण आढळून आले आहेत.
उंदरावरावरील ‘चिगर माईट्स’ या जीवाणुमूळे होणारा स्क्रब टायफसचे रुग्ण आॅगस्ट महिन्यात अचानक आढळून आले. ‘लोकमत’ने सर्वप्रथम हे प्रकरण उजेडात आणले. याची दखल प्रशासनाने घेतली. तातडीने उपाययोजनांना सुृरुवात झाली. परंतु त्यानंतरही आतापर्यंत या रुग्णांची संख्या नागपूर विभागात १८६ वर पोहचली. शहरात या आजाराचे आतापर्यंत ३८ रुग्ण व सहा बळी तर ग्रमीण भागात ५० रुग्ण व सात बळीची नोंद आहे. हा आजार नियंत्रणात कधी येईल, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

Web Title: 186 patients of Scrab Typhus, 29 deaths in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.