नागपुरात पावणेदोन लाखांचे मेफेड्रॉन ड्रग जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 11:51 PM2019-01-07T23:51:04+5:302019-01-07T23:53:25+5:30

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) जावेद ऊर्फ बच्चा अताउल्ला खान (वय ३५, रा. मोठा ताजबाग आझादनगर) आणि अरशद अहमद अशपाक अहमद (वय २१, रा. तोहिदनगर) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पावणेदोन लाखांचे मेफेड्रॉन ड्रग (एमडी पावडर) जप्त केले.

1.5lakhs of mafedron drug seized in Nagpur | नागपुरात पावणेदोन लाखांचे मेफेड्रॉन ड्रग जप्त

नागपुरात पावणेदोन लाखांचे मेफेड्रॉन ड्रग जप्त

Next
ठळक मुद्देतडीपार गुंडासह दोघे जेरबंद : एनडीपीएसची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) जावेद ऊर्फ बच्चा अताउल्ला खान (वय ३५, रा. मोठा ताजबाग आझादनगर) आणि अरशद अहमद अशपाक अहमद (वय २१, रा. तोहिदनगर) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पावणेदोन लाखांचे मेफेड्रॉन ड्रग (एमडी पावडर) जप्त केले.
आरोपी अरशद याला परिमंडळ चारचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी तडीपार केले होते. मात्र, तो सक्करदऱ्यात राहून अमली पदार्थाची तस्करी आणि विक्री करतो, अशी माहिती एनडीपीएसला मिळाली. त्याआधारे सापळा रचून रविवारी दुपारी ४ च्या सुमारास एनडीपीएसच्या पथकाने जावेद आणि अरशदला आझादनगरात पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ५९ ग्राम एमडी पावडर आणि १०० रुपये आढळले. बाजारात या एमडी पावडरची किंमत १ लाख ७७ हजार रुपये आहे. ते जप्त करून पोलिसांनी या दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार सक्करदरा ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम आणि सहायक आयुक्त संजीव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम, सहायक निरीक्षक आर.एस. नागोसे, उपनिरीक्षक स्वप्निल वाघ, अर्जुनसिंग गौर, हवालदार दत्ता बागुल, तुलसी शुक्ला, प्रदीप पवार, सतीश पाटील, नितीन साळुंके, नितीन मिश्रा, नरेश , रुबीना शेख आदींनी ही कामगिरी बजावली.

Web Title: 1.5lakhs of mafedron drug seized in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.