नागपुरात १,३३५ ई-रिक्षाची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:33 AM2018-04-07T00:33:42+5:302018-04-07T00:33:54+5:30

सार्वजनिक रस्त्यावर चालणाऱ्या पर्यावरणपूरक ई-रिक्षा व ई-कार्टची प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने नोंदणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गंत आतापर्यंत १, ३३५ ई-रिक्षा व ४१ ई-कार्टची नोंदणी करण्यात आली आहे. परंतु शहरात एकूण ४ हजारावर ई- रिक्षा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्याच्या नोंदणीला अजूनही फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येते.

1,335 e-rickshaw registration in Nagpur | नागपुरात १,३३५ ई-रिक्षाची नोंदणी

नागपुरात १,३३५ ई-रिक्षाची नोंदणी

Next
ठळक मुद्देप्रादेशिक परिवहन विभागाचा उपक्रमनोंदणीला अजूनही प्रतिसाद नाही

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : सार्वजनिक रस्त्यावर चालणाऱ्या पर्यावरणपूरक ई-रिक्षा व ई-कार्टची प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने नोंदणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गंत आतापर्यंत १, ३३५ ई-रिक्षा व ४१ ई-कार्टची नोंदणी करण्यात आली आहे. परंतु शहरात एकूण ४ हजारावर ई- रिक्षा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्याच्या नोंदणीला अजूनही फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येते.
केंद्र शासनाने मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ६६(१) नुसार ई-रिक्षा व ई-कार्टला वगळले आहे तसेच ई-रिक्षा प्रवासी वाहनास परवान्यातून सूट देण्यात आली असली तरी देखील या वाहनांना मोटार वाहन अधिनियम, महाराष्ट्र मोटार वाहन नियमातील तरतुदी लागू आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने या अधिनियमाच्या अनुषंगाने ई-रिक्षा व ई-कार्टची नोंदणी सुरु असून, सध्या शहर कार्यालयाकडे ७० ई-रिक्षा व ५ ई-कार्टची तसेच उप प्रादेशिक कार्यालयाकडे १२६५ ई-रिक्षा व ३६ ई-कार्टची नोंदणी करण्यात आली आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने नोंदणी केलेल्या वाहनांना इलेक्ट्रीक कीट बसविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ई-रिक्षा व ई-कार्ट वाहनधारकांनी त्याच्या मालकीची वाहने परिवहन कार्यालयात नोंदवून घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (शहर) यांनी केले आहे.

Web Title: 1,335 e-rickshaw registration in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.