You too should take the initiative to strengthen democracy | लोकशाही बळकट करण्यासाठी तुम्हीसुद्धा पुढाकार घ्या
लोकशाही बळकट करण्यासाठी तुम्हीसुद्धा पुढाकार घ्या

मुंबई : लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे म्हणून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. ट्विटर या सोशल नेटवर्क साईट्सचा यासाठी प्रामुख्याने वापर केला जात असून, आता १९५० या हेल्पलाइनद्वारेही मतदारांना ‘आपली लोकशाही बळकट करण्यासाठी तुम्हीसुद्धा पुढाकार घ्या...’ असे आवाहन केले जात आहे.

सोशल नेटवर्क साईटवरील ट्विटरद्वारे अधिकाधिक जनजागृती केली जात असून, यात हॅशटॅगनेही भर घातली आहे. लोकशाहीने आपल्याला दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करा, वाया घालवू नका. तुमचे एक मतदेखील देशाच्या हितासाठी महत्त्वाचे आहे. लोकसभा निवडणूक २०१९ च्या आपल्या मतदारसंघातील निवडणुकांची तारीख पाहा, आवर्जून मतदान करा, असे आवाहन केले जात आहे. देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आजच मतदार नोंदणी करा. लोकशाहीला अधिक बळकट बनविण्यासाठी मतदानाचा हक्क पारदर्शकपणे पार पाडा, असे आवाहन करून विविध हॅशटॅगद्वारे जनजागृती केली जात असल्याचे चित्र सध्या सोशल साईटवर पाहायला मिळत आहे.

हेल्पलाइनवर आतापर्यंत ३५० कॉल
जिल्हाधिकारी कार्यालयात या हेल्पलाइनची सेवा सुरू आहे. १ मार्चपासून ही सेवा सुरू आहे. परंतु, आचारसंहिता लागल्यापासून या हेल्पलाइनचा जिल्ह्यातील जाणकारांनी लाभ घेतला आहे. तक्रारीऐवजी मार्गदर्शनासाठी युवक-युवतींनी या हेल्पलाइनचा लाभ घेतल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले.जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. उमेदवारी दाखल होण्याच्या १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणी सुरू आहे. यामुळे युवकांकडून अर्ज दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी आवश्यक माहिती त्यांच्याकडून घेतली जात आहे.
आयटी अ‍ॅप्लिकेशन म्हणजे मोबाइल अ‍ॅपचा या निवडणुकीत प्रथमच वापर सुरू आहे. आचारसंहिता भंगाची तक्रार सी व्हिजिल अ‍ॅपद्वारे करण्याची संधी देण्यात आली आहे. परंतु, अद्यापही या अ‍ॅपचा वापर झालेला आढळून आलेला नाही. या अ‍ॅपद्वारे तक्रार येताच अवघ्या १०० मिनिटांत म्हणजे सुमारे दीड तासात त्यावर कारवाई होणार आहे. पण, अद्यापही या अ‍ॅपचा वापर झालेला नाही. याशिवाय, सुविधा अ‍ॅपद्वारे मतदारांना वाहन सुविधेसह पाणी, स्वच्छता आदींची माहिती मिळवता येईल. याशिवाय, सुगम अ‍ॅपद्वारे राजकीय पक्षांना सभांसाठी सार्वजनिक ठिकाणची मैदाने बुकिंगसह जाहिरातीची ठिकाणे बुक करणे शक्य होणार आहे.

ठाणे : निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याच्या तक्रारीसह निवडणुकीसंबंधित माहिती विचारण्यासाठी १९५० ही हेल्पलाइन २४ तास सुरू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागल्याच्या कालावधीपासून या हेल्पलाइनवर आतापर्यंत जिल्हाभरातून सुमारे ३५० कॉल आले आहेत. याद्वारे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी सर्वाधिक मार्गदर्शन विचारण्यात आले आहे.

हॅशटॅग
#महिलासशक्तीकरण
#लोकसभानिवडणूक२०१९
#मतदान
#स्त्रीशक्तीदेशाची
#मोलतुझ्यामताचे
#माझेमतअमूल्य
#एउक #ए’ीू३्रङ्मल्ल2019


Web Title: You too should take the initiative to strengthen democracy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.