जागतिक पशू दिन - मुंबईत सप्टेंबरपर्यंत १८ हजार श्वानांची नसबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 05:34 AM2018-10-04T05:34:46+5:302018-10-04T05:35:03+5:30

त्रास कमी करण्यासाठी उपाययोजना : गेल्या चार वर्षांत श्वानांवरील या शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढले

World Bird Day - By 18th September in Mumbai, sterilization of 18,000 vehicles | जागतिक पशू दिन - मुंबईत सप्टेंबरपर्यंत १८ हजार श्वानांची नसबंदी

जागतिक पशू दिन - मुंबईत सप्टेंबरपर्यंत १८ हजार श्वानांची नसबंदी

googlenewsNext

कुलदीप घायवट 

मुंबई : भटक्या श्वानांची वाढती संख्या, रेबीजचा धोका, श्वानांचा चावा अशा त्रासाला मुंबईकरांना सामोरे जावे लागत होते. हा त्रास दूर करण्यासाठी श्वानाची नसबंदी करण्यात येत आहे. जानेवारी २०१८ ते सप्टेंबर २०१८ पर्यंत १८ हजार श्वानाची नसबंदी करण्यात आली आहे. मागील वर्षी २४ हजार २९० भटक्या श्वानाची नसबंदी करण्यात आली होती.

मागील चार वर्षाचा आढावा घेतल्यास श्वानावर नसबंदी करण्याची आकडेवारी वाढली आहे. २०१४ साली ७ हजार ६४, २०१५ साली ६ हजार ३६६, २०१६ साली ११ हजार ९६७ आणि २०१७ साली २४ हजार २९० इतक्या श्वानाची नसबंदी करण्यात आली आहे. महापालिकेच्या देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांनी सांगितले की, दरवर्षी श्वान निर्बिजीकरण शस्त्रक्रिया केली जाते. श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी अशाप्रकारची शस्त्रक्रिया केली जाते. श्वानाच्या नसबंदीची आकडेवारी मागील वर्षी आणि यावर्षी सारखी असल्याने दोन वर्षाचा अहवाल समतोल असल्याचे दिसून येते. महापालिकेद्वारे श्वानावर नसबंदी केली जाते. महापालिकेची सहा सेंटर श्वान निर्बिजीकरणासाठी काम करते. त्यामुळे श्वानाची संख्या नियंत्रणात आहे. त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून नाही. सध्या श्वानाची आकडेवारी किती आहे, याचा अहवाल तयार केला जात आहे.
बृहन्मुंबई महापालिकेद्वारे २०१२ साली १९ वी पशुगणना करण्यात आली. यामध्ये महापालिका क्षेत्रात ४७ हजार २६३ कुत्रे होते. तर २०१४ साली महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या गणनेनुसार महापालिका क्षेत्रात ९५ हजार १७२ भटके कुत्रे होते़

बृहन्मुंबई महापालिकेद्वारे प्रथमच मोठ्या प्रमाणावर २८ सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन साजरा करण्यात आला. यामध्ये तब्बल १ हजार ५९७ भटक्या श्वानांना रेबीजची लस देण्यात आली. बृहन्मुंबई महापालिकेचे डॉक्टर, मुंबई पशू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर, अशासकीय संस्था आणि खासगी संस्था यांच्यावतीने श्वानांना रेबीज लस देण्यात आली.

मांजरांची गणना
महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग यांच्यामार्फत मुंबईतील पशुगणनेमध्ये भटक्या मांजराची गणना करण्यात येत नव्हती. त्यामुळे मुंबईतील भटक्या मांजरांच्या संख्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाने तयार केलेल्या नियमावलीनुसार भटक्या श्वानांची नसबंदी करण्यात येते. भटक्या मांजरांची नसबंदी करण्याबाबत कुठलीही नियमावली नाही. त्यामुळे प्राणी जनन नियंत्रण कार्यक्रमांतर्गत भटक्या मांजरांना समाविष्ट करण्याबाबत व मार्गदर्शक तत्वे कळविण्यासाठी अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाशी पालिकेचा पत्रव्यवहार सुरु असल्याचे महापालिकेच्या देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांनी सांगितले.

Web Title: World Bird Day - By 18th September in Mumbai, sterilization of 18,000 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.