मे महिन्यापासून कोस्टल रोडचे काम, मुख्यमंत्र्यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 01:46 AM2018-03-22T01:46:25+5:302018-03-22T01:46:25+5:30

नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यानच्या प्रस्तावित कोस्टल रोडच्या कामास पर्यावरण खात्याची मंजुरी मिळाली असून येत्या मे महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली.

The work of the Coastal Road from May, Chief Minister's information | मे महिन्यापासून कोस्टल रोडचे काम, मुख्यमंत्र्यांची माहिती

मे महिन्यापासून कोस्टल रोडचे काम, मुख्यमंत्र्यांची माहिती

Next

मुंबई : नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यानच्या प्रस्तावित कोस्टल रोडच्या कामास पर्यावरण खात्याची मंजुरी मिळाली असून येत्या मे महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली.
प्रस्तावित नरिमन पॉइंट ते कांदिवली या सागरी मार्गाची प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी आणि वांद्रे ते कांदिवली जंक्शन लिंक रोड अशा दोन भागांत विभागणी झाली आहे. महापालिकेची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. काँग्रेसचे संजय दत्त यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
वर्सोवापर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सागरी सेतू बांधण्यात येणार असून या कामास पर्यावरण विभागाची मंजुरी मिळालेली आहे. महामंडळाने या कामाच्या निविदा मागविल्या असून लवकरच काम सुरू करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सुरक्षा प्रमाणपत्रानंतर मोनोचा नवा मार्ग
रेल्वे सुरक्षा आयुक्तांडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, मुंबईतील संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर दरम्यानचा मोनो रेल्वेचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. याच आठवड्यात रेल्वे आयुक्तांचा पाहणी दौरा असून, त्यानंतर प्रमाणपत्र मिळेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

ठाणे-भिवंडी-कल्याण दरम्यान मेट्रो
ठाणे-भिवंडी-कल्याण दरम्यानच्या मेट्रो-५ या प्रकल्पाला राज्य सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली असून, जून २०१८ पासून या मार्गाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Web Title: The work of the Coastal Road from May, Chief Minister's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.