मनपा सांभाळण्यास महिला सक्षम!रीसर्च सेंटर फॉर वूमेन्स स्टडिज्चे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 04:56 AM2018-03-08T04:56:47+5:302018-03-08T04:56:47+5:30

मुंबई महापालिकेतील नगरसेविका या राजकीयदृष्ट्या सक्रिय आणि सक्षम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जुहू येथील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या रीसर्च सेंटर फॉर वूमेन्स स्टडिज् विभागाने केलेल्या सर्वेक्षणात या माहितीवर शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्र सरकारच्या इंडियन कौन्सिल आॅफ सोशल सायन्सेस रीसर्चसाठी संस्थेने या सर्वेक्षणात मुंबई मनपातील ५० नगरसेविकांचा अभ्यास केलेला आहे.

Women's to be managed by the NGO! Research Center for Women's Studies survey | मनपा सांभाळण्यास महिला सक्षम!रीसर्च सेंटर फॉर वूमेन्स स्टडिज्चे सर्वेक्षण

मनपा सांभाळण्यास महिला सक्षम!रीसर्च सेंटर फॉर वूमेन्स स्टडिज्चे सर्वेक्षण

googlenewsNext

- अक्षय चोरगे
मुंबई - मुंबई महापालिकेतील नगरसेविका या राजकीयदृष्ट्या सक्रिय आणि सक्षम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जुहू येथील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या रीसर्च सेंटर फॉर वूमेन्स स्टडिज् विभागाने केलेल्या सर्वेक्षणात या माहितीवर शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्र सरकारच्या इंडियन कौन्सिल आॅफ सोशल सायन्सेस रीसर्चसाठी संस्थेने या सर्वेक्षणात मुंबई मनपातील ५० नगरसेविकांचा अभ्यास केलेला आहे.
या सर्वेक्षणातून महिला राजकरणात मिळालेल्या संधीचे सोने करीत असल्याचे मत नोंदविण्यात आले आहे. रीसर्च सेंटर फॉर वूमेन्स स्टडिज्च्या प्राध्यापिका डॉ. वत्सला शुक्ला यासंदर्भात म्हणाल्या की, सर्वेक्षणाच्या प्राथमिक अभ्यासातून मुंबई मनपातील नगरसेविका सक्षम असण्याचे अनेक पैलू समोर आले आहेत. मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून ५० टक्के आरक्षणाचा निर्णय झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात महिला राजकारणात उतरल्या.

पक्षात ‘त्यां’च्या शब्दाला महत्त्व
७५ टक्के महिलांना वाटते की, पक्षात आणि पालिकेत त्यांच्या शब्दाला महत्त्व आहे. या महिलांनी स्वत:चा जनसंपर्क वाढवला आहे. राजकारणात ज्या रोलमॉडेलमुळे आल्या आहेत, त्यांच्याशिवाय या महिलांनी स्वत:ची ओळख तयार केली आहे.
नवरा पुढे येऊ देत नाही!
एकतृतीयांश महिला अल्पशिक्षित आहेत, त्यांचा नवरा त्यांना राजकारणात पुढे येऊ देत नाही. परंतु त्यांच्यामध्ये शिकण्याची धडपड पाहायला मिळाली. दुस-या प्रकारातील महिला शिक्षित आहेत, परंतु त्यांना राजकारणाची योग्य जाण नसल्याने मागे पडतात. तिसºया प्रकारातील महिला राजकारणात कोणाच्यातरी छत्रछायेखाली वावरतात. असल्यामुळे त्या स्वतंत्र नाहीत.
शिक्षण आणि अभ्यास गरजेचा
राजकारणातील ज्या महिला आजही सक्षम झालेल्या नाहीत किंवा राजकारणात फार सक्रिय नाहीत अशा महिला केवळ कमी शिक्षण किंवा राजकारणाच्या कमी ज्ञानामुळे मागे आहेत.
माहितीपट बनणार
या सर्वेक्षणावर आधारित पुस्तक येत्या काळात प्रकाशित केले जाणार असून त्यावर अधारित माहितीपटदेखील तयार केला जाणार आहे.

महाविद्यालयांमध्ये डॉक्टर्स, इंजिनीअर्स घडवले जातात. राजकारणी का तयार केले जात नाहीत? असा सवाल सर्व्हेक्षणादरम्यान बहुतांश नगरसेविकांनी उपस्थित केला.

Web Title: Women's to be managed by the NGO! Research Center for Women's Studies survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.