Woman's uncommon credentials shine: The story's leadership style | महिलांच्या असामान्य कर्तृत्वाला उजाळा : कहाणी ‘ती’च्या नेतृत्वशीलतेची

प्रत्येक क्षेत्रात आणि पक्षात कार्यकर्त्यापासून कर्मचाºयापर्यंत मर्यादित न राहता, आता नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेऊन
महिला आगेकूच करीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांत प्रतिनिधित्व मिळावे म्हणून महिलांना ५० टक्के आरक्षण
मिळाले असले, तरी तसा मान अद्याप त्यांना मिळाल्याचे दिसत नाही. याउलट लाखो कर्मचाºयांच्या मागण्यांसाठी
प्रसंगी रस्त्यावर उतरणाºया महिला कामगार नेत्यांनाही अधिकारी वर्गाकडून मिळणारा दुजाभाव बरेच काही सांगून
जातो. त्याचाच ऊहापोह विविध क्षेत्रांत नेतृत्व करणाºया असामान्य महिलांकडून जाणून घेतला आहे, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने..


राजकारणातला ‘झगडा’...
स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षणाद्वारे प्रतिनिधित्व मिळाले असले, तरी तशी वागणूक
अद्याप मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. महिला सक्षमपणे नेतृत्व करत असल्याचे वेळोवेळी सिद्ध होऊनही,
त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आंदोलन करताना महिलांना परवानगीपासूनच झगडावे लागते. पुरुष
नेत्यांच्या तुलनेत महिला नेत्यांची पदोपदी प्रशासनाकडून अडवणूक केली जाते. मग ते राजकारण असो वा
समाजकारण. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तशी संस्कृती नसली, तरी काही पक्षांमध्ये ती स्पष्टपणे दिसते. महिला
नेतृत्वाला डावलण्याचे प्रकार दिसतात. मात्र, तरीही राजकीय कारकिर्दीत महिला नेत्या आपली वेगळी ओळख निर्माण
करताना दिसत आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने त्या अधोरेखित होत आहेत, हे महत्त्वाचे आहे.
- सुरेखा पेडणेकर, अध्यक्षा - मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेस.

अधिका-यांशी ‘रोखठोक’ चर्चा करताना...
कोणत्याही प्रकारच्या कर्मचाºयांच्या प्रश्नांवर प्रशासकीय अधिकाºयांशी वाटाघाटी करताना, कधी-कधी दुजाभाव होत असल्याचे  निदर्शनास येते. मुळात पुरुष नेत्यांच्या डोळ्यात- डोळे घालून वाटाघाटी करणारे काही अधिकारी महिला नेत्यांकडे पाहातही नाहीत. चर्चेदरम्यान त्यांचा रोख महिला नेत्यांसोबत असलेल्या पुरुष नेत्यांकडे असतो. मात्र, तरीही दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांशी दामटून बोलतो. महिला नेतृत्व तयार झाल्याने महिला कर्मचाºयांना अनेक वेळा अडचणी व समस्या मांडताना सोईस्कर जाते. विशेषत: आरोग्य
आणि शिक्षण विभागातील महिला कर्मचारी निर्धास्तपणे अडचणी मांडतात. आशा वर्करला निरोधवाटपाचे काम दिले होते, तेव्हा
महिला नेत्यांची बरीच मदत झाली होती. लैंगिक छळ असो वा अपमानाच्या घटना, महिला कर्मचारी निर्धास्तपणे मांडतात. महिला नेतृत्वामुळे महिला कर्मचा-यांची पिळवणूक करणाºया अधिकाºयांच्या बºयाच कुप्रथांना आळा
घालता आला आहे.
- शुभा शमीम, अंगणवाडी
व आशा कर्मचा-यांच्या नेत्या.

‘मेट्रो ३’चे नेतृत्व करताना...
मुंबई ‘मेट्रो ३’ हा अतिशय आव्हानात्मक आणि व्यापक स्वरूपाचा प्रकल्प आहे. मेट्रोच्या कामात जसे पुरुष अधिकारी आहेत, तसेच महिला अधिकारीही आहेत. मुंबईमध्ये पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामाचा पाच ते सहा वर्षांचा अनुभव त्यांना आहे. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्री कर्मचारी व अधिका-यांची संख्या नक्कीच कमी आहे. मात्र, स्त्रियांना पुरुषांहून वेगळी वागणूक मिळत नाही. यात एक सहकार्याची भावना असते, तसेच दुस-यांकडून शिकायलाही मिळत असते. मुळात ‘महिला दिन’ हा वेगळा
साजरा करण्याची वेळच येऊ नये. प्रत्येक दिन हा ‘महिला दिन’ असला पाहिजे. कारण जगामध्ये निम्मी शक्ती ही महिलांचीच आहे. मात्र,
जेवढ्या प्रमाणात त्यांचे सुप्त गुण आहेत, तेवढा त्यांचा वापर होत नाही, हे दुर्दैव आहे. ज्या क्षेत्रात महिला गेल्या, त्या क्षेत्रात त्यांनी उत्तुंग
अशी कामगिरी करून दाखविली. म्हणूनच प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना सुवर्णसंधी दिली पाहिजे. बºयापैकी महिलांना संधी मिळाली, तर समाजाचा विकास जलद गतीने होईल.
- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक,
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन


Web Title:  Woman's uncommon credentials shine: The story's leadership style
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.