टॉवर क्लॉक कधी बसणार?, इमारत डागडुजीचे काम संपून कार्यालये पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 02:18 AM2017-11-23T02:18:51+5:302017-11-23T02:19:00+5:30

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील क्रॉफर्ड मार्केट येथील महात्मा फुले मंडई इमारतीच्या डागडुजीचे काम प्रशासनाने हाती घेतले होते.

When will a tower clock be completed? After the completion of the repair work, the offices resume | टॉवर क्लॉक कधी बसणार?, इमारत डागडुजीचे काम संपून कार्यालये पुन्हा सुरू

टॉवर क्लॉक कधी बसणार?, इमारत डागडुजीचे काम संपून कार्यालये पुन्हा सुरू

Next

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील क्रॉफर्ड मार्केट येथील महात्मा फुले मंडई इमारतीच्या डागडुजीचे काम प्रशासनाने हाती घेतले होते. त्या वेळी इमारतीवरील टॉवर क्लॉक हटविण्यात आले. इमारतीच्या डागडुजीचे काम संपून इमारतीतील कार्यालये पुन्हा सुरू झाली आहेत. महात्मा फुले मंडई इमारतीत असणारी पालिकेची कार्यालेदेखील सुरू झाली आहेत. मंडईमध्ये बाजार सुरू झाला आहे. परंतु इमारतीवरील टॉवर क्लॉक बसविण्यात आलेले नाही.
येथील स्थानिकांनी आणि
सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार पालिकेकडे टॉवर क्लॉक बसविण्याची मागणी केली आहे. परंंतु पालिका प्रशासन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
महात्मा फुले मंडईसारख्या इमारती आणि इमारतींवरील टॉवर क्लॉक मुंबईची शोभा वाढवतात. अशा वेळी या वास्तूंची नीट देखभाल न होणे वाईट बाब आहे. पालिका प्रशासनाने टॉवर क्लॉक बसवावे, अशी मागणी मंडईतील
कामगार आणि स्थानिकांनी केली आहे. इमारतीच्या डागडुजीचे
काम वर्षभरापूर्वी पूर्ण झाले,
तरीही टॉवर क्लॉक बसवले
नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अझिज अमरेलीवाला यांनी यासंदर्भात २ मे आणि १३
मे २०१७ रोजी पालिका आयुक्तांना आणि पालिकेच्या मुख्य अभियंत्यांना (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल)
पत्र लिहिले आहे. परंतु दोघांकडूनही उत्तर आले नाही. त्यानंतर आठवड्याभरापूर्वी पुन्हा
आयुक्तांना पत्र पाठवले, मात्र आयुक्तांकडून कार्यवाही झालेली नाही.
यासंदर्भात महापालिकेच्या ए वॉर्डचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, हेरिटेज विभाग काम पाहत आहे. फेज वन आणि फेज टू असा कामाचा प्रकार होता. फेज वनचे काम पूर्ण झाले आहे.
फेज टूमधील काही काम अद्याप पूर्ण झालेले नाही. फेज टूच्या कामादरम्यान टॉवर क्लॉक पुन्हा बसविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Web Title: When will a tower clock be completed? After the completion of the repair work, the offices resume

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई