स्नेहा मोरे 
मुंबई : गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयात गुरुवारी महिला निवासी डॉक्टरने आत्महत्या केली. या आत्महत्येचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी पुन्हा एकदा ताणतणावात असलेल्या निवासी डॉक्टरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने निवासी डॉक्टरांची आरोग्य तपासणी आवश्यक असल्याचे परिपत्रक काढले होते. मात्र दीड वर्ष उलटूनही या परिपत्रकाची अंमलबजावणी झाली नसून हे परिपत्रक धूळ खात पडले आहे.
मुंंबईत कामाच्या अतितणावामुळे निवासी डॉक्टरांचे शारीरिक व मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. रुग्णालयातील रिक्त पदे, अठरा तासांची ड्युटी, रुग्णांची वाढती संख्या, स्पर्धात्मक युग, रुग्णाच्या नातेवाइकांकडून होणारी मारहाण आणि अपेक्षित ठिकाणी नियुक्ती न होणे या सर्वांचा ताण डॉक्टरांच्या आरोग्यावर पडत आहे. त्यामुळे त्यांना मधुमेह, मानसिक ताण, रक्तदाब, हृदयविकार अशा विविध त्रासांना सामोरे जावे लागत आहे. निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने दिलेल्या पत्रानुसार, २०१६ साली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकीय विद्याशाखेच्या पदव्युत्तर अभ्यास मंडळे व संलग्न असलेल्या महाविद्यालयांना निवासी डॉक्टरांची सहामाही शारीरिक व मानसिक तपासणी बंधनकारक करावी याविषयी पत्रक पाठविले होते.
याविषयी मुंबईतील निवासी डॉक्टर नचिकेत (नाव बदललेले) विचारले असताना, एकदाही आरोग्य तपासणी झाली नसल्याचे सांगत ही तपासणी होणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयात काम करताना बºयाचदा टोकाचे विचार मनात येतात. काही वेळा या छोट्या-छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले की थेट आत्महत्येचे पाऊल उचलले जाते. परंतु, याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्यामुळे सहा महिन्यांतून ही तपासणी होणे गरजेचे असल्याचे अंगद (नाव बदललेले) या निवासी डॉक्टरने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

...आणि ‘ती’ पळून गेली !
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने निवासी डॉक्टरांची आरोग्य तपासणी आवश्यक असल्याचे परिपत्रक काढले होते. मात्र दीड वर्ष उलटूनही या परिपत्रकाची अंमलबजावणी झालेली नाही.
चार-पाच महिन्यांपूर्वीची ही घटना आहे. मुंबईत प्रख्यात रुग्णालयात निवासी डॉक्टर असलेली २५ वर्षांची तरुणी स्त्रीरोगतज्ज्ञ विभागात कार्यरत होती.
मात्र रात्रंदिवस कामाच्या शिफ्ट्स, अपुरी झोप, अचानक आलेल्या जबाबदाºया या कारणांमुळे ही तरुणी तीन महिने काम केल्यानंतर घरी पळून गेली होती.
घरी गेल्यानंतर स्वत:च्या क्षमतेला दोष देत आत्महत्येचा विचारही तिने केला होता. मात्र तिच्या कुटुंबाने वेळीच ही लक्षणे ओळखून मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेण्यास सांगितले, त्यानंतर ती ४-५ महिन्यांत बरी झाली.

कामाच्या अतिताणामुळे ‘अ‍ॅडजस्टमेंट डिसॉर्डर’
अलीकडच्या एका घटनेमध्ये सायन रुग्णालयातील पहिल्या वर्षाला २६ वर्षांच्या निवासी डॉक्टरला आरोग्य सेवा सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळातच ताण आला. त्यामुळे बºयाचदा त्याच्या हातून लहान-लहान चुका व्हायला लागल्या. त्यामुळे कधी-कधी वरिष्ठांकडून ओरडा मिळत असे आणि पुन्हा त्याचे टेन्शन घेऊन चुकांची पुनरावृत्ती होऊ लागली.त्या वेळी रुग्णालयातील अन्य सहकाºयांनी मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेण्याचा आग्रह धरला तेव्हा लक्षात आले की, त्या तरुणाला अ‍ॅडजस्टमेंड डिसॉर्डर झाला आहे. त्यानंतर त्वरित समुपदेशन आणि औषधोपचार सुरू करण्यात आले. त्या तरुणावर सहा महिने उपचार सुरू होते, त्यातून तो पूर्णपणे बरा झाला.

डॉक्टरच नाही म्हणतात...
सहामाही किंवा वार्षिक अशा ठरावीक कालावधीत आम्ही आरोग्य तपासणी करीत नाही. मात्र आवश्यकता असते तेव्हा निवासी डॉक्टरांच्या आरोग्यविषयक तपासण्या केल्या जातात. अशा वेळेस बºयाचदा ‘डॉक्टरच नाही म्हणतात’. त्यामुळे निवासी डॉक्टरच आरोग्य तपासणीसाठी येत नाहीत, अशी माझी तक्रार आहे.
- डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय

गेल्या वर्षी एका निवासी डॉक्टरने केलेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर त्वरित आम्ही निवासी डॉक्टरांच्या आरोग्याविषयी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे लेखी निवेदन दिले होते. तसेच विद्यापीठाने ते मंजूर करून सर्व महाविद्यालये, संस्थांना कळविले होते. मात्र तरीही अद्याप त्याविषयी ठोस पावले उचलली नसून एकदाही तपासणी झालेली नाही. एमबीबीएस पूर्ण केल्यावर पदव्युत्तर शिक्षण घेताना डॉक्टरांना अभ्यासाच्या बरोबरीनेच बाह्यरुग्ण विभाग पाहणे, रुग्णांवर उपचार करणे हे सर्व अभ्यासाचा एक भाग म्हणून पाहावे लागते. पण रुग्णसेवा करणाºया निवासी डॉक्टरांचे मानसिक आरोग्य
त्यामुळे धोक्यात येत आहे.
निवासी डॉक्टरांवरील अतिरिक्त ताणामुळे मनोविकाराचे प्रमाण वाढत आहे.
- डॉ. सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ,
केईएम रुग्णालय


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.