पश्चिम रेल्वे प्रवाशांचा लेटमार्क कायम! १० लोकलच्या इंजिनमध्ये पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 06:23 AM2018-07-12T06:23:21+5:302018-07-12T06:24:04+5:30

अतिवृष्टीमुळे वसई-विरार रेल्वेमार्ग पाण्याखाली गेल्याने विरार कारशेडमधील तब्बल १० लोकलच्या इंजिनमध्ये पाणी गेल्यामुळे लोकलमध्ये बिघाड झाला आहे.

 Western Railway passenger late mark | पश्चिम रेल्वे प्रवाशांचा लेटमार्क कायम! १० लोकलच्या इंजिनमध्ये पाणी

पश्चिम रेल्वे प्रवाशांचा लेटमार्क कायम! १० लोकलच्या इंजिनमध्ये पाणी

Next

मुंबई : अतिवृष्टीमुळे वसई-विरार रेल्वेमार्ग पाण्याखाली गेल्याने विरार कारशेडमधील तब्बल १० लोकलच्या इंजिनमध्ये पाणी गेल्यामुळे लोकलमध्ये बिघाड झाला आहे. यामुळे बुधवारी दिवसभरात १३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर ४० लोकल विलंबाने धावत असल्याची
माहिती पश्चिम रेल्वेने दिली. परिणामी, बिघाड दुरुस्त होईपर्यंत प्रवाशांना लेटमार्क आणि गर्दीच्या
लोकलचा सामना करावा लागणार आहे.
गेले चार दिवस कोसळणाºया मुसळधार पावसाने बुधवारी विश्रांती घेतल्यानंतर, तसेच रेल्वे रुळावरील पाण्याची पातळी सुरक्षिततेच्या स्तरापर्यंत आल्यानंतर लोकल सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला. त्यानुसार, तब्बल २४ तासांनंतर बुधवारी ८ वाजून ५० मिनिटांनी पहिली लोकल सकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी चर्चगेटहून विरारसाठी रवाना झाली. दुपारी २ वाजून १५ मिनिटांपर्यंत सर्व मार्गांवरील लोकल सुरू करण्यात आल्या. तथापि, बुधवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंतही नालासोपारा डाउन रेल्वे रुळावर ९० मिलीमीटर पाणी साचले होते, तर नालासोपारा फलाटातील रेल्वे रुळांवर २५ मिमी पाणी साचले होते. यामुळे वसई-विरार मार्गावरील लोकल १० ते २० किमी प्रतितास या वेगमर्यादेसह धावत आहेत. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सुमारे ९९ रेक आहेत. ८९ रेक सेवेत असून, १० रेकच्या इंजिनमध्ये पाणी भरल्यामुळे नादुरुस्त झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे लोकलसह मेल-एक्स्प्रेसला सर्वाधिक फटका बसला. भविष्यात रेल्वे रुळावरून पाणी येऊ नये, यासाठी पश्चिम रेल्वे वसई-विरार टप्प्यात दोन कल्व्हर्ट उभारणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाºयांनी गोपनीयतेच्या अटीवर दिली.

शताब्दी एक्स्प्रेस रद्द
गुरुवारी धावणारी मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेस आणि अमृतसर-मुंबई सेंट्रल
गोल्डन टेंपल एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. बुधवारी सौराष्ट्र, डबल डेकर, कर्नावटी आणि फ्लार्इंग राणीसह तब्बल १५ मेल - एक्स्प्रेस रद्द आणि १९ मेल - एक्स्प्रेस अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.

Web Title:  Western Railway passenger late mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.