दिवाळीचे उत्साहात स्वागत : पणतीच्या प्रकाशात भेदला निराशेचा काळोख

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 05:56 AM2018-11-07T05:56:03+5:302018-11-07T05:56:16+5:30

दिवाळीच्या दुसऱ्या म्हणजे नरक चतुर्दशी दिवशी मुंबईकरांनी पहाटे अभ्यंगस्नान करत दिवसाची सुरुवात गोड केली. उटणे, तेल मर्दन, नरकरूपी पापवासनांचा नायनाट आणि अहंकाराचे उच्चाटन करून दारोदारी मुंबईकरांनी पणत्या तेवत ठेवल्या.

Welcome to Diwali: The darkness of despair penetrates the light | दिवाळीचे उत्साहात स्वागत : पणतीच्या प्रकाशात भेदला निराशेचा काळोख

दिवाळीचे उत्साहात स्वागत : पणतीच्या प्रकाशात भेदला निराशेचा काळोख

Next

मुंबई - दिवाळीच्या दुसऱ्या म्हणजे नरक चतुर्दशी दिवशी मुंबईकरांनी पहाटे अभ्यंगस्नान करत दिवसाची सुरुवात गोड केली. उटणे, तेल मर्दन, नरकरूपी पापवासनांचा नायनाट आणि अहंकाराचे उच्चाटन करून दारोदारी मुंबईकरांनी पणत्या तेवत ठेवल्या. भल्या पहाटे म्हणजेच चारच्या सुमारास अभ्यंगस्नानापासून सुरू झालेल्या आजच्या दिवसाचा समारोप गगनातील आतषबाजीने झाला.
नरक चतुर्दशीशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले होते, असे मानतात. अशाच काहीशा दीप प्रज्वलित दीपावलीच्या शुभेच्छा मुंबईकरांनी रविवारपासूनच देण्यास सुरुवात केली. वसुबारस, धनत्रयोदशी आणि नरक चतुर्दशी याची आणखी भर पडली. सोशल नेटवर्क साइट्सवर दीपावलीच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू असतानाच नरक चतुर्दशी दिवशी मुंबईकरांनी पहाटे चार वाजल्यापासूनच फटाक्यांची आतषबाजी केली. न्यायालयाच्या निर्देशाच्या पार्श्वभूमीवर भल्या पहाटे केलेल्या आतषबाजीचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी बच्चेकंपनीने आतषबाजीचा मनमुराद आनंद लुटला.
अभ्यंगस्नान उरकल्यानंतर दिव्यांसह रांगोळ्यांनी सजलेल्या उंबरठ्यांनी दीपावलीचा आनंद द्विगुणित केला. सूर्योदयाच्या सोनेरी किरणांनी दीपावली प्रकाशमय होत असतानाच नव्या कोºया वस्त्रांनी मुंबापुरीच्या सौंदर्यात आणखी भर घातली. गिरगावपासून लालबाग आणि मुलुंडपासून बोरीवलीच्या बाजारपेठा दीपावलीच्या उत्साहाने न्हाऊन निघाल्या. संस्कृती आणि तेजाचा सण म्हणून ओळखल्या जाणाºया दीपावलीची खरेदी-विक्री अद्यापही सुरूच असून, बाजारपेठांमध्ये गर्दी कायम आहे.
महत्त्वाचे म्हणजे फराळाचा गोडवा कायम राखत सोशल नेटवर्क साइट्सवर मंगळवारी शुभेच्छांचा वर्षाव झाला. पुढील तीन दिवस मुंबईकरांचा दीपावलीचा उत्साह आणखी वाढणार असल्याचे चित्र सध्या तरी आहे.
न्यायालयाच्या निर्बंधांमुळे फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी असले तरी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी होत असल्याने मुंबईकरांनीही समाधान व्यक्त केल्याचे चित्र तुर्तास तरी पाहायला मिळत आहे.

नियमानंतरही आतषबाजी काही प्रमाणात सुरूच

रात्री ८ ते १० वाजेदरम्यान फटाके उडविण्यात यावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर याच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारने ठोस भूमिका घ्यावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले होते. मंगळवारी मात्र निर्देशांची काही प्रमाणात पायमल्ली करण्यात आली. मंगळवारी पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी फटाके उडविण्यात आले. मात्र, फटाके फोडण्याचे प्रमाण दरवर्षीच्या तुलनेत अत्यल्प होते. दरम्यान, या संदर्भात कारवाईबाबत कोणत्याही स्थानिक पोलीस ठाण्याकडून अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.

Web Title: Welcome to Diwali: The darkness of despair penetrates the light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.