जल पर्यटन, पोर्ट ट्रस्टच्या विविध प्रकल्पांद्वारे मुंबईचे चित्र बदलणार - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 02:23 AM2018-11-18T02:23:01+5:302018-11-18T02:23:28+5:30

पोर्ट ट्रस्टद्वारे करण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत झाले. तरंगत्या उपाहारगृहांचेदेखील या वेळी उद्घाटन करण्यात आले.

Water Tourism, Port Trust's various projects will change Mumbai's picture - Nitin Gadkari | जल पर्यटन, पोर्ट ट्रस्टच्या विविध प्रकल्पांद्वारे मुंबईचे चित्र बदलणार - नितीन गडकरी

जल पर्यटन, पोर्ट ट्रस्टच्या विविध प्रकल्पांद्वारे मुंबईचे चित्र बदलणार - नितीन गडकरी

Next

मुंबई : मुंबईच्या मोठ्या किनारपट्टीचा लाभ घेत, जल पर्यटन व इतर प्रकल्पांच्या माध्यमातून देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यात यश मिळेल व याद्वारे अर्थव्यवस्थेला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते विकास व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. पोर्ट ट्रस्टद्वारे करण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत झाले. तरंगत्या उपाहारगृहांचेदेखील या वेळी उद्घाटन करण्यात आले.
शिवडी ते एलिफंटा रोपवे (८ किमी) निविदा प्रक्रिया, सुपर स्पेशालिटी हा स्पिटल निविदा प्रक्रिया, एमबीपीटी ईस्टर्न वॉटर फ्रंटचे भूमिपूजन आणि इतर उपक्रमाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी गडकरी म्हणाले की, या प्रकल्पांमुळे मुंबईची प्रतिष्ठा व महत्त्व वाढेल. देशाला २० हजार किमीचा समुद्र किनारा लाभला असून, त्याचा उपयोग पर्यटन व्यवसाय वाढीसाठी करता येऊ शकेल. मुंबईत सिंगापूरच्या धर्तीवर मोठे गार्डन उभारण्याचा सरकारचा विचार सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. नवी मुंबई विमानतळाला समुद्रमार्गे जोडून काही मिनिटांत विमानतळावर जाता येईल, अशी योजना राबविण्यात येत असून, त्याबाबत सकारात्मक अहवाल प्राप्त झाला आहे. तरंगते उपाहारगृह ही मुंबईच्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट असून, यामुळे परदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतील, अशा प्रकारची ५० उपहारगृहे सुरू झाली तरी कमी पडतील, अशी परिस्थिती असल्याचे गडकरी म्हणाले.
बीपीटीतर्फे एक हजार बेडचे सुसज्ज रुग्णालय बनविण्यात येणार असून, त्यामध्ये मुंबईतल्या गरिबांना मोफत उपचार मिळतील, असे ते म्हणाले.
जलमार्गे रो रो सेवाही लवकर सुरू होईल. त्यामुळे मुंबईकरांच्या वेळेची बचत होईल. इंधनावरील खर्चही कमी होईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. वाहतूक क्षेत्रात होत असलेले बदल कौतुकास्पद आहेत. मरिन क्षेत्रात वापरण्यात येणाºया इंधानमध्ये बायो इंधनाचा वापर करण्याची सूचना त्यांनी केली. सध्या मुंबईत ८० क्रूझ येतात, ही संख्या ९०० पर्यंत नेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
राज्यात २ लाख ३५ हजार कोटी किमतीचे ११५ प्रकल्प सुरू असून, ५,८८४ कोटी किमतीचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. मेट्रो प्रकल्पात मिळालेले डेब्रिज हे पोर्ट ट्रस्टमधील रेक्लिेमेशनसाठी वापरण्यात येईल. त्याद्वारे ४०० कोटींची बचत झाली आहे. मुंबईत जागतिक दर्जाचे गार्डन उभारून त्या माध्यमातून मुंबईकरांना स्वच्छ प्रदूषणमुक्त हवा मिळेल, असेही गडकरी म्हणाले.
मुंबई ही देशाची जल पर्यटनामध्ये राजधानी बनेल, असा विश्वास एमबीपीटीचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी व्यक्त केला. या वेळी जलसंधारणमंत्री गिरीश महाजन, उपाध्यक्ष यशोधर वनगे, सदस्य सुनील राणे, म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अमीन पटेल, राज पुरोहित, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.

सव्वा लाख लोकांना मिळणार रोजगार
पर्यावरणाच्या नावावर त्रास देणाºयांची मुंबईत कमी नाही. मात्र, प्रकल्प राबविताना अनेक अडचणी असतात, त्यातून मार्ग काढण्यात आला आहे, असे ते म्हणाले. जेएनपीटीमध्ये विविध प्रकल्पांच्या माध्यमातून सव्वा लाख लोकांना रोजगार मिळणार आहे, असे गडकरी म्हणाले. यातील ८० टक्के नोकºया कोकणातल्या तरुणांना द्याव्यात, अशी सूचना गडकरी यांनी केली.

केंद्रीय रस्ते विकास व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी पोर्ट ट्रस्टद्वारे करण्यात येणाºया प्रकल्पांचे भूमिपूजन तसेच तरंगत्या उपाहारगृहांचेदेखील उद्घाटन करण्यात आले.

Web Title: Water Tourism, Port Trust's various projects will change Mumbai's picture - Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.