मुंबईत पाणीबाणी; पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 04:24 AM2019-06-04T04:24:22+5:302019-06-04T06:38:26+5:30

मुंबईकरांना ऐन पावसाळ्यात जलटंचाईला सामोरे जावे लागू नये, म्हणून मुंबई महापालिकेने नियोजन सुरू केले आहे, शिवाय मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहनही केले आहे

Water shortage in Mumbai; Appeal for the use of water conservation | मुंबईत पाणीबाणी; पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन

मुंबईत पाणीबाणी; पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन

Next

मुंबई : मान्सून अद्यापही अंदमानातच अडकला असून, मुंबईत मान्सून दाखल होण्यास १३ जूननंतरचा कालावधी उजाडणार आहे. तोवर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रातील जलसाठा आणखी खालवणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, आजघडीला पाण्याची पातळी खालावत असल्याने, दहा टक्केच पाणीसाठा तलाव क्षेत्रात शिल्लक राहिला आहे.

मान्सून आणखी लांबल्यास किंवा पुरेसा पाऊस अपेक्षित दिवसांत झाला नाही, तर मात्र महापालिकेला राखीव साठा वापरावा लागणार आहे. मुंबईकरांना ऐन पावसाळ्यात जलटंचाईला सामोरे जावे लागू नये, म्हणून मुंबई महापालिकेने नियोजन सुरू केले आहे, शिवाय मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहनही केले आहे.

मुंबई शहर आणि उपनगरास दिवसाला ३ हजार ८०० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या धरणांतून हा पाणीपुरवठा केला जातो. सध्याच्या जलसाठ्याचा विचार करता, मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. दहा टक्के पाणीकपात करण्यात आल्याने रोजचा पुरवठा ३ हजार ५०० दशलक्ष लीटरवर आला आहे.

जुलै अखेरपर्यंतच पाणीपुरवठा करणे शक्य
मुंबईला पाणीपुरवठा करत असलेल्या सातही तलावांत एकूण वर्षभरासाठी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर पाणी असणे आवश्यक असते. गेल्या वर्षी कमी पाऊस पडला. परिणामी, या वर्षी दोन लाख दशलक्ष लीटर पाणीसाठा कमी आहे. राखीव साठ्याचा विचार केला, तरी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंतच पाणीपुरवठा करणे शक्य आहे. सध्याचा मान्सूनचा वेग पाहता आणि मान्सून लांबला, तर महापालिका पाण्याचे नियोजन कसे करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Web Title: Water shortage in Mumbai; Appeal for the use of water conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.