कृत्रिम शेततळ्यांद्वारे २०० अब्ज लीटर्स पाणी बचत; मुंबईतील मैथिली अप्पलवार यांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 02:15 AM2019-05-12T02:15:21+5:302019-05-12T02:15:39+5:30

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जलसंवर्धनाच्या पारंपरिक पद्धतीचा वापर करून २०० अब्ज लीटरपेक्षा जास्त पाण्याचे संवर्धन करण्यात आले आहे. परिणामी, शेकडो शेतकऱ्यांना उपजीविकेचे पर्याय उपलब्ध झाले.

Water savings by 200 million liters by artificial peasants; Initiative of Maithili Appalwar in Mumbai | कृत्रिम शेततळ्यांद्वारे २०० अब्ज लीटर्स पाणी बचत; मुंबईतील मैथिली अप्पलवार यांचा पुढाकार

कृत्रिम शेततळ्यांद्वारे २०० अब्ज लीटर्स पाणी बचत; मुंबईतील मैथिली अप्पलवार यांचा पुढाकार

Next

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जलसंवर्धनाच्या पारंपरिक पद्धतीचा वापर करून २०० अब्ज लीटरपेक्षा जास्त पाण्याचे संवर्धन करण्यात आले आहे. परिणामी, शेकडो शेतकऱ्यांना उपजीविकेचे पर्याय उपलब्ध झाले. यात दुष्काळग्रस्त भागातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, सोलापूरसारख्या जिल्ह्यांचा विशेषत: वाळवंट असलेल्या राजस्थानातील जिल्ह्यांचाही समावेश आहे.
राज्यातल्या दुष्काळाच्या झळा पाहून मूळच्या चंद्रपूरच्या असलेल्या आणि अमेरिकेत इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या २२ वर्षीय मैथिली अप्पलवार अस्वस्थ झाल्या. जलसंवर्धन उपाययोजनेबाबत तोडगा सुचविण्यासाठी ज्या वेळी अनेक स्टार्ट-अप्स, स्वयंसेवी संस्था पुढे आल्या त्यात अप्पलवारदेखील होत्या. भारतातील पाणी समस्येवर पारंपरिक पद्धतीने मात करता येऊ शकते; हा विचार घेऊनच त्या अमेरिकेतून भारतात परतल्या. त्यानंतर मुंबईत स्थायिक झाल्या. गेल्या दोन वर्षांत ५ हजार शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी जलसंवर्धनाची मोहीमच हाती घेतली.
महाराष्ट्रात अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगाव, बुलडाणा, धुळे, वाशिम, हिंगोली आणि नाशिक तर राजस्थानातील जैसलमेर, बीकानेर, चुरु, श्रीगंगानगर, हनुमानगढ, नागौर आणि भीलवाडा येथे मिळून त्यांनी २०० अब्ज लीटर पाण्याचे संवर्धन केले.
पिकांच्या सिंचनात मदत
गेल्या दोन वर्षांत भारतात ५,००४ तलाव बनविण्यात आले. यामध्ये २०० अब्ज लीटर पाणी साठवले गेले. जवळपास ३० हजार लोकांच्या जीवनावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडत आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांत १० हजार हेक्टरपेक्षाही जास्त भागात पिकांच्या सिंचनात मदत मिळाली आहे.

असा होतो जलसंचय
- जलसंचयासाठी शेतात मोठा खड्डा खोदला जातो. त्यावर एक पॉलिमर अस्तर घातले जाते. खड्ड्याचे अस्तरीकरण झाल्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही. यामुळे कृत्रिम शेततळे तयार होते. यात पावसाचे पाणी, नदीमधून वाहून येणारे अतिरिक्त पाणी जमा करून ठेवले जाते.
- जलसंचयासाठी दरवर्षी १ पैसा प्रति लीटर या दराने खर्च येतो. ही रक्कम पाणी साठविण्यासाठी वापरल्या जाणाºया याच आकाराच्या काँक्रिट टँकच्या खर्चाच्या फक्त १/१० भागाइतकीच आहे. राज्य सरकारच्या अनुदानाचाही याकरिता वापर करता येतो.

परिवर्तनासाठी युवांनी पुढे येणे गरजेचे
सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची जी शक्ती युवापिढीमध्ये आहे; ती मला नेहमीच प्रभावित करते. शेतकºयांना समृद्ध करणे हे माझे स्वप्न आहे. सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी युवा, उत्साही लोकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन मैथिली अप्पलवार यांनी केले आहे.

६० टक्क्यांपेक्षा जास्त भाग दुष्काळी
२०१८ सालच्या नीती आयोगाच्या अहवालानुसार, भारत सर्वाधिक गंभीर जलसंकटाचा सामना करीत आहे. देशातील ६० टक्क्यांपेक्षा जास्त भाग दुष्काळी आहे. देशातील एकतृतीयांशपेक्षा जास्त जिल्ह्यांना गेल्या दशकात चारपेक्षा जास्त वेळा दुष्काळाला सामोरे जावे लागले. २०३० सालापर्यंत भारतात पाण्याची मागणी पाण्याच्या उपलब्ध पुरवठ्यापेक्षा दुपटीने वाढलेली असेल.

Web Title: Water savings by 200 million liters by artificial peasants; Initiative of Maithili Appalwar in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.