मुंबई - टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली डिसेंबर महिन्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्नबेडीत अडकणार आहे. यासाठी डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरोधात होणाऱ्या कसोटी सामन्यातून विराटने सुट्टीसाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.  BCCI ला दिलेल्या अर्जामध्ये त्याने सुट्टीचे कारण खासगी असल्याचे सांगितले आहे. एवढेच नाही तर अनुष्काच्या काही जवळच्या मित्रांनी सांगितले आहे की, डिसेंबर महिन्यात तिला शुटिंग करायचे नाही आहे. त्यामुळे दोघेही डिसेंबर महिन्यात लग्न करण्याच्या विचारात आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.  

दरम्यान, दिवाळी सणानिमित्त प्रसिद्ध झालेल्या मान्यवरच्या जाहिरातीतही दोघं एकत्र झळकले होते. या जाहिराताची थीमही लग्न या विषयावर आधारित होती. यात ते दोघे एकमेकांना लग्नातील सात वचन देताना दिसले. श्रीलंकेविरोधातील कसोटी सामान्यात टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा समावेश झालेला असतानाही बीसीसीआयच्या अधिका-यांनी सांगितले की, कॅप्टनशीपमध्ये रोटेशन पॉलिसी लागू होऊ शकते. तर दुसरीकडे निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी यावेळी कोहलीला ब्रेक देण्याची गरजही व्यक्त केली.

दरम्यान, कोहली श्रीलंकाविरोधात होणा-या सर्व कसोटी सामन्यांमध्ये खेळणार आहे. प्रसाद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत असेही सांगितले की, ''कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येईल, अशी चर्चा रंगली होती. पण हे योग्य नाही. कसोटी मालिकेबाबत बोलायचे झाल्यास तो खेळेल आणि वेळ आल्यास कर्णधारासाठीही रोटेशन पद्धतीचा अवलंब होईल. आम्ही कोहलीच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असून तो आयपीएलपासून सातत्याने खेळत आहे. त्याला नक्कीच विश्रांती देणे गरजेचे आहे आणि यावर कसोटी मालिकेनंतर विचार करण्यात येईल''.

16 नोव्हेंबरपासून कोलकात्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. श्रीलंकेचा संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौ-यावर येणार आहे. दरम्यान, श्रीलंके विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी संघ निवडण्यात आला आहे.

विराटच्या सुट्टी अर्जाबाबत नेमकं कारण समोर अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. मात्र, डिसेंबर महिन्यात विराटला अनुष्कासोबत लग्न करायचे असल्यानं त्यानं बोर्डाकडे सुट्टीची मागणी केली आहे, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. तर दुसरीकडे जानेवारी 2018ला टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिका दौ-यापूर्वीच विराट-अनुष्काला लग्नगाठ बांधायची असल्याची चर्चा आहे.   

कोहलीची विश्रांती लांबवली 
संघनिवडीआधी कॅप्टन विराट कोहलीला विश्रांती मिळणार असल्याची मोठी चर्चा रंगली. मात्र, कोहलीने न्यूझीलंडविरुद्धची टी२० मालिका आणि लंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांदरम्यान ब्रेक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. लंकेविरुद्धचे पहिले दोन कसोटी सामने अनुक्रमे कोलकाता व नागपूर येथे खेळविण्यात येतील. त्याचवेळी, कर्णधारासाठीही रोटेशन पद्धतीचा अवलंब करण्यात येईल, असे राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी म्हटले. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यासह मर्यादित षटकांच्या मालिकेमध्ये कोहलीला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, यानंतर होणाºया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या खडतर दौ-यासाठी कोहली तंदुरुस्त असणे महत्त्वाचे आहे. 
 

महत्त्वाचे विराट आणि अनुष्काच्या लग्नाची जरी तुफान चर्चा असली तरीही लग्नाच्या तारीख अजूनही समोर आलेली नाही. 

भारतीय कसोटी संघ - विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पूजारा, रोहित शर्मा, वृद्धीमान सहा, आर.अश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पांडया, मोहम्मद शामी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा. 

न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघ 
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, एमएस धोनी (विकेटकिपर), हार्दिक पांडया, अक्षर पटेल, यझुवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, मोहम्मद सिराज, 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.