हिंसक आंदोलन पटत नव्हते!‘खळ्ळखट्याक्’मुळे पक्षांतर : मनसेचे बंडखोर नगरसेवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:18 AM2017-11-17T02:18:43+5:302017-11-17T02:19:49+5:30

‘खळ्ळखट्याक्’ आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे एक समीकरण बनले आहे. याच खळ्ळखट्याक् राजकारणाचा आधार घेत मनसेने आपला जनाधार वाढवला होता.

Violent movement was not there! Vary due to Khalkhaktiak: MNS rebel corporator | हिंसक आंदोलन पटत नव्हते!‘खळ्ळखट्याक्’मुळे पक्षांतर : मनसेचे बंडखोर नगरसेवक

हिंसक आंदोलन पटत नव्हते!‘खळ्ळखट्याक्’मुळे पक्षांतर : मनसेचे बंडखोर नगरसेवक

Next

मुंबई : ‘खळ्ळखट्याक्’ आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे एक समीकरण बनले आहे. याच खळ्ळखट्याक् राजकारणाचा आधार घेत मनसेने आपला जनाधार वाढवला होता. असे असले तरी मनसेतून शिवसेनेत उडी मारलेल्या नगरसेवकांना मात्र खळ्ळखट्याक् पटत नव्हते. या हिंसक आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होत असल्यानेच आपण पक्षांतर केल्याचा अजब दावा या नगरसेवकांनी केला आहे.
मनसेतून पक्षांतर करत शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनसेने कोकण विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर दिलेल्या लेखी उत्तरात नगरसेवकांनी खळबळजनक दावे केले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हिंसक आंदोलनांमुळे जनजीवन विस्कळीत होत असल्याने आम्ही अस्वस्थ होतो.
आम्हाला पक्षाच्या कोणत्याही निर्णयात सहभागी करून घेतले जात नव्हते. आम्ही मनसेच्या तिकिटावर निवडणूक जिंकलो, पण पक्षातील पदांबाबत तसेच वेळोवेळी होणाºया निर्णयांबाबत आमच्यात अस्वस्थता होती, असेही या नगरसेवकांनी उत्तरात नमूद केले आहे.
मराठी माणूस मुंबईच्या महापौरपदी राहणे आवश्यक आहे, असे सांगत दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर केलेल्या लेखी उत्तरात त्यांनी मराठी महापौरवगैरेविषयी चकार शब्द काढला नाही.

Web Title: Violent movement was not there! Vary due to Khalkhaktiak: MNS rebel corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.