वर्सोव्याला मिळाला जागतिक पर्यावरण दिनाचा बहुमान 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 10:04 PM2018-05-23T22:04:43+5:302018-05-23T22:04:43+5:30

वर्सोवा बीच क्लिनिग चे जनक अँड.अफराेज शाह यांच्या मेहनतीचे फळ म्हणून यंदा संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक पर्यावरण दिन हा वर्साेवा बीच येथे साजरा करण्याचे ठरविले आहे.येत्या रविवार 27 मे रोजी सकाळी 6 ते 9 या दरम्यान सुमारे 5000 नागरिकांच्या उपस्थितीत वर्सोवा कोळीवाडा येथील देवाची वाडी येथे ही बीच क्लिनिग मोहिम सुरु होणार आहे.

Varsova receives the honor of the World Environment Day | वर्सोव्याला मिळाला जागतिक पर्यावरण दिनाचा बहुमान 

वर्सोव्याला मिळाला जागतिक पर्यावरण दिनाचा बहुमान 

Next

 - मनोहर कुंभेजकर

मुंबई - वर्सोवा बीच क्लिनिग चे जनक अँड.अफराेज शाह यांच्या मेहनतीचे फळ म्हणून यंदा संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक पर्यावरण दिन हा वर्साेवा बीच येथे साजरा करण्याचे ठरविले आहे.येत्या रविवार 27 मे रोजी सकाळी 6 ते 9 या दरम्यान सुमारे 5000 नागरिकांच्या उपस्थितीत वर्सोवा कोळीवाडा येथील देवाची वाडी येथे ही बीच क्लिनिग मोहिम सुरु होणार आहे.प्लास्टिक विरोधात चळवळ वृद्धीगत करण्यासाठी 
याप्रसंगी संयुक्त राष्ट्राचे पर्यावरण प्रमुख एरीक सोहलेम,केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ.हर्षवर्धन,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे,पर्यावरण मंत्री रामदास कदम,वर्सोव्याच्या स्थानिक आमदार डॉ.भारती लव्हेकर व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती अफरोझ शाह यांनी दिली.

15 ऑक्टोबर 2015 साली वर्सोवा येथील गंगाभवन समोरील एव्हरेस्ट सोसायटीत राहण्याऱ्या आणि पेशाने वकील असणाऱ्या अफरोझ ने बकाल वर्सोवा बीचचा चेहरामोहरा बदलण्याचे स्वप्न बघितले होते.त्याच्या कार्याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्राचे पर्यावरण प्रमुख एरीक सोहलेम यांनी 2 ऑक्टोबर 2016 रोजी वर्सोवा बीचला भेट देऊन अफरोझचे कौतुक केले होते.

आजपर्यंत  शनिवार आणि रविवारी 139 आठवडे सकाळी अफरोझ शाह आणि वर्सोवा रेडिडंट्स व्हालॅटियर्स(व्हीआरर्व्ही) वर्सोवा बीच स्वच्छ करत असून आज पर्यंत सुमारे 15000 मिलियन किलो कचरा येथून काढण्यात आल्याची माहिती त्याने दिली.
 या स्वच्छता मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे तिवरांच्या जंगलातील कचरा गोळा करण्यासाठी प्रायोजकांनी 3 छोट्या बोटी उपलब्ध करून दिल्या आहेत,तर समुद्रात उतरून 50 मीटर आतील कचरा जलतरणपट्टू गोळा करणार आहेत,तसेच प्लास्टिक उद्योजक वर्सोवा सह अन्य महत्वाच्या ठिकाणी ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे सुमारे 200 दालन उपलब्ध करून देणार असल्याची माहिती अफरोझ शाह याने दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफरोझ च्या मोहिमेचे आपल्या मन की बात या कार्यक्रमात कोतुक केले होते,तर त्याचे अनुकरण करून युनायटेड नेशनने देखिल आता त्यांच्या भागातील बीच क्लिनिगची मोहिम हाती घेतली आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे,बीग बी अमिताभ बच्चन आणि वर्सोव्याच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर देखिल त्याच्या या मोहिमेच्या मागे खंबीरपणे उभ्या आहेत.

 केरळ नंतर मासेमारीत वर्सोव्याचा दुसरा क्रमांक लागतो,मात्र अफराेच्या मेहनतीचे फळ म्हणून यंदा संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक पर्यावरण दिन येत्या 27 मे रोजी हा वर्साेवा बीच येथे साजरा करण्याचे ठरविले हा वर्सोव्याचा मोठा बहुमान आहे असे गौरवोद्गार आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केले.

Web Title: Varsova receives the honor of the World Environment Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.