मुंबई - गुलाबाचं फुल प्रेम व्यक्त करण्याचं उत्तम साधन मानले जाते. व्हेलेंटाईन डेच्या दिवशी तरुण-तरुणी आवडत्या व्यक्तीला गुलाबाचं फुल देऊन आपलं प्रेम व्यक्त करतात. कारण त्याचे सौंदर्य काही औरच आहे. गुलाब प्रेमाचं प्रतीक आहे. हेच गुलाब तुमच्या व्यक्तिमत्त्वाबाबतची बरंच काही सांगते, हे तुम्हाला माहिती आहे का? प्रेमाचं प्रतीक मानले जाणारे गुलाब जितक्या रंगांचे आहे, त्या-त्या आवडीच्या रंगांच्या गुलाबानुसार तुमचे व्यक्तिमत्त्व दर्शवलं जाते. तुम्हाला ज्या रंगांचं गुलाब पसंत आहे, त्या रंगानुसार तुमचे व्यक्तिमत्त्व ओखळले जाऊ शकते. तर तुम्हीदेखील जाणून घ्या, कोणत्या रंगाच्या गुलाबानुसार कसे आहे तुमचे व्यक्तिमत्त्व...

1.लाल रंगाचे गुलाब

जर तुम्हाला लाल रंगाचे गुलाब आवडत असेल, तर तुमचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. ज्यांना लाल रंग पसंत आहे, ती लोकं शूर, प्रामाणिक आणि अतिशय सामाजिक असतात. एखादं जोडलेले नाते तुम्ही शेवटपर्यंत जपता, हाच तुमचा प्रामाणिकपणाच आहे. या व्यक्ती नेहमी भविष्याचा विचार करतात. मोठ्या प्रमाणात योजना आखल्यानंतरही अनेकदा या व्यक्ती तणावात असल्याचं पाहायला मिळतात. तणावमुक्त होण्यासाठी कधी-कधी आराम करणंही तेवढंच महत्त्वाचे आहे.

2. गुलाबी रंगाचे गुलाब

जर तुम्हाला गुलाबी रंगाचे गुलाब आवडत असेल तर तुम्ही भावनिक स्वभावाचे आहात. या स्वभावाच्या व्यक्ती भावनेच्या भरात कधी-कधी एवढे वाहत जातात की त्यांना हे जग चांगलं वाटत नाही आणि आपण या जगात राहण्यासाठी योग्य नसल्याचे त्यांना विचार येऊ लागतात. अशा स्वभावाच्या व्यक्ती स्वतःला कमी लेखतात. तुम्हाला स्वतःवरील विश्वास आणखी वाढवण्याची गरज आहे आणि जी लोकं तुम्हाला पसंत करतात, अशा व्यक्तीसोबत वेळ घालवणं तुमच्यासाठी गरजेचं आहे.

3. दोन रंगांच्या छटांचे गुलाब

जर तुम्हाला दोन रंगांच्या छटा असलेले गुलाब पसंत असेल तर तुम्ही हसमुख स्वभावाचे आहात. याद्वारे तुमचे यशस्वी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. या स्वभावाच्या व्यक्ती आयुष्यात नेहमी सकारात्मक असतात. या व्यक्ती अतिशय उत्साही आणि नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी -शिकण्यासाठी उत्सुक असतात. प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन काही तर करण्याची इच्छा असते.

4. पिवळ्या रंगाचे गुलाब

या व्यक्ती अतिशय व्यावहारिक असतात. अयोग्य व चुकीच्या गोष्टींविरोधात या स्वभावाच्या व्यक्तींच्या मनात अतिशय राग व चीड असते. जगातील सर्व चुकीच्या गोष्टी दुरुस्त करुन एक नवीन आणि सुंदर जग साकारण्याची इच्छा या स्वभावाच्या व्यक्तींच्या मनात असते. भविष्याबाबत विचार करण्याच्या नादात कधी-कधी या व्यक्तींना वर्तमान काळाचा विसर पडतो. त्यामुळे अशा स्वभावाच्या व्यक्तींना भविष्याबाबतची चिंता कमी करुन वर्तमान काळात जगणं आवश्यक आहे.

5. निळ्या रंगाचे गुलाब

निळ्या रंगाचे गुलाब आवडणा-या व्यक्तींना भविष्याची चिंता करण्याची काहीच काळजी नसते कारण ते आपली कामं अतिशय प्रामाणिकपणे पार पाडतात. आपल्या प्रत्येक कामात या व्यक्ती 110 टक्के देतात. या कौशल्यामुळे असे व्यक्तिमत्त्व असणा-या व्यक्तींच्या कामाचं सर्वत्र कौतुक होते.


Web Title: valentines day 2018 rose color reveals secret about your personality
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.