तरुणाईत व्हॅलेंटाइनची क्रेझ, टेडी बीयरने सजले बाजार, मुंबई झाली ‘सेलिब्रेशनमय’

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 3:31am

व्हॅलेंटाइन वीकच्या सेलिब्रेशनमध्ये सध्या मुंबईकर दंग आहेत. रोझ डे, प्रपोझ डे, चॉकलेट डे च्या सेलिब्रेशननंतर आता मुंबईकर टेडी डे साठी सज्ज झाले आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीला भेट वस्तू देताना प्रत्येकाच्या डोक्यात सर्वप्रथम टेडी बीयरच येतो. टेडी डे निमित्त मुंबईत सर्वत्र टेडी बीयरची खरेदी विक्री सुरू आहे.

मुंबई : व्हॅलेंटाइन वीकच्या सेलिब्रेशनमध्ये सध्या मुंबईकर दंग आहेत. रोझ डे, प्रपोझ डे, चॉकलेट डे च्या सेलिब्रेशननंतर आता मुंबईकर टेडी डे साठी सज्ज झाले आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीला भेट वस्तू देताना प्रत्येकाच्या डोक्यात सर्वप्रथम टेडी बीयरच येतो. टेडी डे निमित्त मुंबईत सर्वत्र टेडी बीयरची खरेदी विक्री सुरू आहे. बाजार टेडी बीयरने सजले आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीला टेडी बीयर देण्यामागचे कारण असे की, ‘मी कायम तुझ्यासोबत आहे’ हा संदेश तिला/त्याला देणे. लहान टेडी बीयर आपण नेहमी सोबत ठेवू शकतो. त्यामुळे मी २४ तास तुझ्यासोबत आहे. हे सांगण्यासाठी लहाण टेडी बीयर भेट म्हणून दिला जातो. तर भल्या मोठ्या आकाराच्या टेडी बीयरला आपण त्याची/तिची आठवण आल्यावर गोंजारू शकतो, राग आल्यावर, भांडण झाल्यावर त्या टेडीला मारून राग व्यक्त करू शकतो. त्यामुळे मोठ्या आकाराचे अगदी त्याच्या/तिच्या उंचीएवढे टेडी देण्याची पद्धतही रुजलेली आहे. महाविद्यालयात असताना त्याने दिलेला टेडी बीयर वयाची तिशी-चाळीशी ओलांडल्यानंतरही सोबत जपून ठेवला आहे, अशी कित्येक जोडपी पहायला मिळतात. अनेकांच्या रिलेशनशीप्समध्ये टेडी बीयर महत्त्वाची भूमिका बजावतो. अशा या टेडी बीयरचा दिवस साजरा करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीला भेट देण्यासाठी आकर्षक टेडी शोधणारे असंख्य युवक युवती सध्या बाजारांमध्ये फिरताना दिसत आहेत. टेडी बीयरचा ट्रेंड आला कुठून? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांच्या सेवकांनी जंगली अस्वल पकडले होते. ते अस्वल त्यांनी झाडाला बांधले व राष्टÑाध्यक्षांनी त्याला गोळी मारण्याची विनंती केली. परंतु बांधलेले अस्वल थिओडोर यांनी मारले नाही. त्या अस्वलाला नंतर सोडून देण्यात आले. यावर माध्यमांनी मोठ्या प्रमाणात बºया-वाईट प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या. व्यंगचित्रकारांनी या घटनेवर आधारीत व्यंगचित्रे प्रसिद्ध केली. असे एक व्यंगचित्र मॉरिस मिचटम या दुकानदाराने वर्तमान पत्रात पाहिले व त्यानुसार त्याने कापडाचे अस्वल बनविण्याचे ठरवले. थिओडोर यांचे टोपण नाव टेडी असल्याने मिचटम यांनी तयार केलेल्या कापडी अस्वलाला थिओडोर यांच्या परवानगीने टेडी असे नाव देण्यात आले. असे अनेक ‘टेडी’ मिचटम यांनी विक्रसाठी ठेवले. १९०३ साली अमेरिकेतील अनेक प्रमुख बाजारांमध्ये टेडींची विक्री सुरू झाली तेव्हापासून टेडी बीयरचा ट्रेंड सुरू झाला आहे. तो अद्यापपर्यंत जगभरात फॉलो केला जात आहे.

संबंधित

ऐकावे ते नवलंच! चविष्ठ खाद्यपदार्थांसाठी मुलाने सोडले घर 
Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 18 जानेवारी 2019
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तास बंद 
महापौरांचा नवा पत्ता - राणीची बाग, बंगल्यात लवकरच होणार स्थलांतर
रावांच्या आंदोलनामुळे पालिकेतील कामगार संघटना धास्तावल्या

मुंबई कडून आणखी

मुंबईत असूनही पंकजा मुंडे मंत्रिमंडळ बैठकीस गैरहजर
७२ तासांपेक्षा जास्त काळ केबल बंद राहिल्यास पैसे भरावे लागणार नाहीत
युती झाली तर ‘स्वाभिमान’ सर्व जागा लढविणार - राणे
रेल्वे ट्रॅक, रस्त्यांखालील कल्व्हर्टच्या सफाईसाठी रोबो
मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ पुरस्कारांचे आज वितरण

आणखी वाचा