मासळी ठेवण्यासाठी फायबर इन्स्टुलेटेड बॉक्सचा वापर करावा - किरण कोळी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 08:49 PM2018-06-25T20:49:51+5:302018-06-25T20:50:27+5:30

पर्यावरणाच्या रक्षणाचा   आणि मच्छिमारांच्या भवितव्याचा विचार करता थर्माकोल बॉक्स ऐवजी शासनाने मासळी ठेवण्यासाठी फायबर इन्स्टुलेटेड बॉक्सचा वापर करण्यासाठी 100 % सबसीडी अंतर्गत  मासे विक्रेत्या महिलांना सवलत द्यावी.

Use fiber-installed box to keep fish. - Kiran Koli's demand | मासळी ठेवण्यासाठी फायबर इन्स्टुलेटेड बॉक्सचा वापर करावा - किरण कोळी यांची मागणी

मासळी ठेवण्यासाठी फायबर इन्स्टुलेटेड बॉक्सचा वापर करावा - किरण कोळी यांची मागणी

googlenewsNext

 - मनोहर कुंभेजकर

मुंबई - मच्छिमारांना मासळी आणण्यासाठी वापरण्यात येणारा डब्बा (रॅक) त्यातील थर्माकोलला बंदी नसून तशी अधिसूचनेत तरतूद केली असल्याची घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज दुपारी मंत्रालयात झालेल्या एका पत्रकार परिषदेत घोषणा केली होती.या घोषणेचे महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी स्वागत केले आहे.मात्र पर्यावरणाच्या रक्षणाचा   आणि मच्छिमारांच्या भवितव्याचा विचार करता थर्माकोल बॉक्स ऐवजी शासनाने मासळी ठेवण्यासाठी फायबर इन्स्टुलेटेड बॉक्सचा वापर करण्यासाठी 100 % सबसीडी अंतर्गत  मासे विक्रेत्या महिलांना सवलत द्यावी. आणि तसा  अध्यादेश शासनाने काढावा अशी मागणी त्यांनी मंत्रीमहोदयांकडे केली आहे.
आज अनेक मच्छिमार हे मासळी ठेवण्यासाठी फायबर इन्स्टुलेटेड बॉक्सचा वापर करत असून यात मासळी 8 ते 10 दिवस राहाते.नाशिक महापालिकेने सातपूर भागात खास येथील मासे विक्रेत्यासाठी बॉक्स ठेवण्यासाठी तळघरात एक खोली बांधून दिली आहे. यात फायबर इन्स्टुलेटेड
 बॉक्स मध्ये मासळी ठेऊन ती खोली लॉक करून ठेवण्यात येते. याचा मोठा फायदा येथील मासे विक्रेत्या महिलांना होत आहे.अश्या प्रकारची सुविधा राज्यातील उर्वरित 27 महानगर पालिकांमध्ये कोळी महिलांना त्या त्या पालिकांनी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
 गेल्या शनिवार पासून शासनाने लागू केलेल्या राज्यातील प्लास्टिक बंदीचे देखिल किरण कोळी यांनी स्वागत केले आहे.गटारांच्या वाटे समुद्रात येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील प्लास्टिक पिशव्यांमुळे आज मासळीच्या संवर्धनावर मोठा परिणाम झाला असून समुद्रातील मासळी ही कमी होत चालली आहे.समुद्रातील 
तील वाढते प्लास्टिक आणि थर्माकोल हे भस्मासुर  मच्छिमारांसाठी मृत्यूची घंटा ठरत आहे.प्लॅस्टिकचा सर्वाधिक फटका मच्छिमारांनाच बसतोय. समुद्रच प्लॅस्टिकचा बनल असून मासे मरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यामुळे भविष्यात 2047 साली समुद्रात औषधाला देखिल शिल्लक राहिल  इतकी मासळी देखिल सापडणार नाही अशी भिती मत्स्य शास्त्रज्ञानी व्यक्त केली आहे अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Use fiber-installed box to keep fish. - Kiran Koli's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.