सहा दिवसांत विद्यापीठ जाहीर करणार २७ हजार निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 03:19 AM2017-11-14T03:19:57+5:302017-11-14T03:20:29+5:30

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या आॅनलाइन पेपर तपासणीत झालेल्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये झालेल्या गोंधळामुळे पुनर्मूल्यांकनाचा टक्का वाढला

 The University will announce 27,000 results in six days | सहा दिवसांत विद्यापीठ जाहीर करणार २७ हजार निकाल

सहा दिवसांत विद्यापीठ जाहीर करणार २७ हजार निकाल

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या आॅनलाइन पेपर तपासणीत झालेल्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये झालेल्या गोंधळामुळे पुनर्मूल्यांकनाचा टक्का वाढला, पण हिवाळी सत्राच्या परीक्षा सुरू होण्याआधी म्हणजे अवघ्या ६ दिवसांत विद्यापीठाने तब्बल २७ हजार निकाल जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे.
विधि अभ्यासक्रमासह अन्य अभ्यासक्रमांच्या पुनर्मूल्यांकनाचे रखडलेले निकाल या अभ्यासक्रमाच्या सत्र परीक्षा सुरू होण्याआधी जाहीर करण्यात येतील, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे परीक्षा नियंत्रक घाटुळे यांनी, उच्च व तंंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना सोमवारी फोर्ट कॅम्पस येथे झालेल्या बैठकीत दिले. या वेळी पुढच्या वर्षी परीक्षा झाल्यावर ४५ दिवसांमध्ये विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करावे, त्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये ज्या त्रुटी असतील, त्या तत्काळ दूर कराव्यात, अशा सूचनाही वायकर यांनी दिल्या. विविध अभ्यासक्रमांच्या अद्याप २७ हजार ७४८ उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन होणे बाकी आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार सप्लिमेंट
परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना सप्लिमेंट न देण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला होता, परंतु हा निर्णय योग्य नसून, जर का एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान सप्लिमेंटची गरज भासली, तर त्याला प्रथम दिलेली उत्तरपत्रिका पूर्ण लिहिली आहे का, याची तपासणी करून दुसरी सप्लिमेंट द्यावी, असे निर्देश वायकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाºयांना दिले.

Web Title:  The University will announce 27,000 results in six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.