For the University of Mumbai examination, students will be able to arrive late for one hour | मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा होणार, विद्यार्थ्यांना एक तास उशिराने पोहोचण्यास मुभा

मुंबई - महाराष्ट्र बंदमुळे मुंबईच्या विविध भागात रास्ता रोको, मोर्चे आंदोलने सुरु असली तरी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वाहतुक आणि अन्य कारणांमुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यास विलंब होईल त्यांना वेळ वाढवून देण्यात येईल. 

एक तास उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येईल असे मुंबई विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  आज मुंबई विद्यापीठाच्या एकूण 13 परीक्षा होणार आहेत. सकाळी 11 आणि दुपारी तीन वाजता परीक्षा होणार आहेत. दुपारी तीन वाजता ज्यांचा पेपर आहे ते विद्यार्थी  एक तास उशिराने पोहोचल्यास परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येईल.