उलवे टेकडीतून १.३५ कोटी मेट्रिक टन खडी निघणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 05:56 AM2019-02-09T05:56:19+5:302019-02-09T05:56:52+5:30

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामात सर्वांत मोठा अडथळा असलेल्या उलवे टेकडीच्या उत्खननाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण, गेल्या दीड ते दोन वर्षांत तिचे ब्लास्टिंग करूनही ४० टक्केच उत्खनन झाले आहे. उ

 From the Ulwe hill, it will open 1.35 million metric tonnes | उलवे टेकडीतून १.३५ कोटी मेट्रिक टन खडी निघणार

उलवे टेकडीतून १.३५ कोटी मेट्रिक टन खडी निघणार

Next

- नारायण जाधव

ठाणे - नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामात सर्वांत मोठा अडथळा असलेल्या उलवे टेकडीच्या उत्खननाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कारण, गेल्या दीड ते दोन वर्षांत तिचे ब्लास्टिंग करूनही ४० टक्केच उत्खनन झाले आहे. उर्वरित ६० टक्के उत्खनन बाकी आहे. या उत्खननातून सुमारे एक कोटी ३५ लाख मेट्रिक टन इतक्या प्रचंड प्रमाणात खडी निघणार असून तिचे करायचे काय, याचे उत्तर सिडकोला सापडत नसल्याने आता ती खासगी कंपन्यांना विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे. यातून चार हजार कोटींहून अधिक रक्कम मिळण्याची शक्यता आहे. इच्छुक कंत्राटदाराने स्वत:च स्फोटकांवर नियंत्रण ठेवून टेकडीचे उत्खनन करून खडी काढून विल्हेवाट लावायची आहे. नवी मुंबई विमानतळासाठी २५० हेक्टरहून अधिक खारफुटीच्या दोन हजार हेक्टर जमिनीवर भराव करण्यात येत असून त्यावर दोन हजार कोटींहून अधिक रक्कम सिडको खर्च करत आहे.

दगडखाणी हरित लवादाच्या निर्बंधामुळे बंद

सध्या नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर पट्ट्यातील सर्व दगडखाणी पर्यावरण आणि हरित लवादाच्या निर्बंधामुळे बंद आहेत. त्यामुळे सर्वत्र खडीचा तुटवडा असून अनेक बांधकाम व्यावसायिकांसह महापालिका, एमएमआरडीएकडून सुरू असलेली विकासकामे कूर्मगतीने सुरू आहेत. छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक, न्हावा-शेवा सी लिंक, वाशी खाडीवरील कामासही मोठ्या प्रमाणात खडी लागणार आहे. सध्या बाजारात ३०० रुपये मेट्रिक टनाने खडी विकली जात आहे. यातून चार हजार ५० कोटींहून अधिक रक्कम मिळू शकेल

Web Title:  From the Ulwe hill, it will open 1.35 million metric tonnes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे