अखेर गट विमा योजनेला पुनर्जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:45 AM2018-07-17T01:45:55+5:302018-07-17T01:45:58+5:30

गेले वर्षभर बंद ठेवण्यात आलेली गटविमा योजना लवकरच पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

Ultimately, the revival of the group insurance scheme | अखेर गट विमा योजनेला पुनर्जीवन

अखेर गट विमा योजनेला पुनर्जीवन

googlenewsNext

मुंबई : गेले वर्षभर बंद ठेवण्यात आलेली गटविमा योजना लवकरच पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या योजनेसाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या एक लाख दोन हजार कर्मचाऱ्यांना अखेर दिलासा मिळणार आहे. विमा कंपनीने तिसºया
वर्षी अचानक हप्ता वाढवून मागितल्यामुळे ही योजना आॅगस्ट २०१७ मध्ये बंद पडली. तरीही कर्मचाºयांच्या पगारातून मात्र विम्याची रक्कम नियमित कापून घेण्यात येत होती. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये रोष पसरला होता. या योजनेत कर्मचारी-अधिकाºयांच्या आईवडिलांचाही समावेश करावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात आली होती. मात्र ही मागणी प्रशासनाने फेटाळून लावली आहे.
दरम्यान, बंद काळातही कर्मचाºयांच्या पगारातून पैसे कापून घेण्यात आल्याने कर्मचाºयांना आर्थिक भुर्दंड पडला आहे. त्यामुळे योजना बंद असलेल्या काळात या योजनेचा लाभ कर्मचाºयांना मिळावा यासाठी कंपनीशी चर्चा सुरू असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.
>यामुळे रखडली होती योजना
युनायटेड इन्शुरन्स कंपनीला गट विमा योजनेचे कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीला प्रथम वर्षासाठी सेवाकरासह ८४ कोटी रुपये आणि त्यानंतरच्या पुढील वर्षी ९६ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते.
आॅगस्ट २०१७ ते जुलै २०१८ या वर्षासाठी या कंपनीने १४५ कोटी रुपयांचा दावा केला होता. परंतु प्रशासनाने ११७ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली. पण यापेक्षा एकही पैसा वाढवून देणार नाही, अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतली होती.

Web Title: Ultimately, the revival of the group insurance scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.