१५ दिवसांत डेंग्यूचे दोन हजार संशयित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 04:13 AM2017-10-20T04:13:09+5:302017-10-20T04:13:36+5:30

मुंबई शहर उपनगरांतील बदलत्या वातावरणाचा फटका मुंबईकरांना बसत आहे. ऊन-पावसाचा खेळ आणि जोडीला असलेल्या भयंकर उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.

 Two thousand suspected dengue patients in 15 days | १५ दिवसांत डेंग्यूचे दोन हजार संशयित रुग्ण

१५ दिवसांत डेंग्यूचे दोन हजार संशयित रुग्ण

Next

मुंबई : मुंबई शहर उपनगरांतील बदलत्या वातावरणाचा फटका मुंबईकरांना बसत आहे. ऊन-पावसाचा खेळ आणि जोडीला असलेल्या भयंकर उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. या बदलत्या वातावरणामुळे आजारांचे प्रमाणही वाढते आहे. त्यामुळे वेळीच लक्षणे ओळखून डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आॅक्टोबर महिन्यातील १५ दिवसांत डेंग्यूचे १२४ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, फक्त १५ दिवसांत डेंग्यूचे १ हजार ९६३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत, तसेच सप्टेंबर महिन्यात १५ दिवसांत डेंग्यूचे १६४ रुग्ण आढळले होते. शिवाय, १५ दिवसांत डेंग्यूचे १ हजार ६५९ संशयित रुग्ण आढळून आले होते.

वातावरणातील बदलामुळे नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. थोडा ताप जरी आला, तरी तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन सल्ला आणि उपचार घ्यावेत.
- डॉ. मीनी खेतरपाल, पालिकेच्या साथरोग नियंत्रण विभागाच्या प्रमुख

Web Title:  Two thousand suspected dengue patients in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.