Two more officers will take action | आणखी दोन अधिकाऱ्यांवर होणार कारवाई?
आणखी दोन अधिकाऱ्यांवर होणार कारवाई?

मुंबई : म्हाडा सदनिकावाटप घोटाळ्याप्रकरणी आणखी दोन अधिका-यांवर कारवाई केली जाईल. त्यांची चौकशी सुरू असल्याचे खेरवाडी पोलिसांनी सांगितले. तसेच बेकायदा गाळे ताब्यात घेणाºया लाभार्थ्यांवर कारवाई होणार आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे म्हाडाच्या ११ सदनिकांचे वाटप केल्याप्रकरणी म्हाडाच्या उपसमाज विकास अधिकारी संध्या लांडगे हिला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या चौकशीतून या गैरव्यवहारात अन्य दोन अधिकाºयांची नावे पुढे आली आहेत. त्यांनी गाळा वितरण प्रकरणाच्या फाईलवर स्वाक्षरी केली असून त्यांना चौकशीस बोलवले. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाण्याची
शक्यता तपास अधिकाºयाने वर्तविली. बोगस कागदपत्रांद्वारे सदनिका बळकाविणाºयांवर कारवाई करण्यात येणार आहे.


Web Title:  Two more officers will take action
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.