दादरमध्ये रंगणार दोन दिवसीय गोवा फेस्टिव्हल 2018

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 05:23 PM2018-02-05T17:23:43+5:302018-02-05T17:25:05+5:30

दरवर्षी प्रमाणे यंदाही आठव्या गोवा फेस्टिव्हलचे आयोजन दादर येथील डॉ. अँटोनियो डिसिल्वा टेक्निकल हायस्कूल येथे करण्यात आहे.   १० व ११ फेब्रुवारी २०१८ असे दोन दिवस गोवा फेस्टिव्हल होणार आहे.

Two-day Goa Festival 2018 in mumbai | दादरमध्ये रंगणार दोन दिवसीय गोवा फेस्टिव्हल 2018

दादरमध्ये रंगणार दोन दिवसीय गोवा फेस्टिव्हल 2018

Next

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही आठव्या गोवा फेस्टिव्हलचे आयोजन दादर येथील डॉ. अँटोनियो डिसिल्वा टेक्निकल हायस्कूल येथे करण्यात आहे.   १० व ११ फेब्रुवारी २०१८ असे दोन दिवस गोवा फेस्टिव्हल होणार आहे. गोव्यातील संस्कृतीचा प्रसार, रोजगार निर्मितीसाठी व तेथील वस्तूंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने या गोवा फेस्टिव्हलचं आम्ही गोयंकार या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

या दोन दिवसाच्या महोत्सवात पन्नास स्टॉल्स असून  हे स्टॉल्स दोन्ही दिवस सकाळी १० ते रात्री १० पर्यत खुले राहणार आहेत.  यामध्ये विविध स्पर्धा ,चर्चासत्र ,संगीत, मनोरंजानाचे कार्यक्रम  आदीचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही या गोवा महोत्सवात रसिकांना निःशुल्क प्रवेश राहणार आहे.  

महोत्सवेच उद्घाटन १० फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी १० वाजता  होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या मंगल वागळे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी गणेश स्तोत्र व अर्थवशीषचे पाठ हे सामाजिक सेवा संघाचे विद्यार्थी करणार आहेत. याप्रसंगी मंगल वागळे व गीता कपाडिया याच्यांशी संवाद साधला जाणार आहे. त्यानंतर फळे व फळभाज्या शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे स्वच्छ करावे याचे मार्गदर्शन पिंकी खाबिया करणार आहेत. त्यानंतर  कोंकणी बोलण्याची स्पर्धा , कोंकणी साहित्याचे उगडास , गजाली आणि गीता यासारखे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये गुटगुटीत बालकांची स्पर्धा , पाकस्पर्धा , टॅलेन्ट स्पर्धा,  संगीत कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणा-या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  यंदा गोवा महोत्सवामध्ये भारती दानैत याचे एक्यूप्रेशर  हे खास वैशिष्ट्य असणार आहे.  

गोवा महोत्सवाचे आकर्षण तेथील विविध प्रकारचे स्टॉल्स असणार असून  रसिकांना या महोत्सावात गोवाचे वैशिष्टय असलेली कलाकुसरी पाहायला व खरेदी करण्याचाही आनंदही मिळणार आहे. तसेच खाद्यप्रेमींसाठी गोव्याचे प्रसिद्ध असलेले माश्याचे विविध प्रकाराच्या पाककृतीच्या चवीचा आस्वादही मिळणार आहे.

Web Title: Two-day Goa Festival 2018 in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.