The truck loaded with Kandivali overturned | कांदिवलीत मातीने भरलेला ट्रक उलटला
कांदिवलीत मातीने भरलेला ट्रक उलटला

ठळक मुद्देपालिकेद्वारे नाला बनविण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यावर लोखंडी पत्रा टाकण्यास आला होता. ही घटना आज सकाळी घडली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

मुंबई - कांदिवली पश्चिमेकडील एकता नगर परिसरात पालिकेने खोदलेल्या खड्ड्यात चाक अडकून मातीने भरलेला ट्रक उलटला आहे. ही घटना आज सकाळी घडली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पालिकेद्वारे नाला बनविण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यावर लोखंडी पत्रा टाकण्यास आला होता. जेणेकरून रस्त्यावरून गाड्या ये - जा करू शकतील. मात्र, आज सकाळी पालिकेने खोदलेल्या खड्यात पालिकेचाच ट्रक उलटला आहे. प्रसंगावधान दाखवत ट्रक चालकाने ट्रकमधून उडी मारून आपला जीव वाचवला. 


Web Title: The truck loaded with Kandivali overturned
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.