प्रवासापूर्वी रिक्षा, टॅक्सीच्या नोंदणी क्रमांकाचे छायाचित्र काढा, परिवहनमंत्री  मंत्री दिवाकर रावते यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 07:43 PM2019-01-31T19:43:08+5:302019-01-31T19:43:45+5:30

रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये प्रवास करताना प्रवाशांनी आणि विशेष करुन महिला प्रवाशांनी संबंधित वाहनांच्या नोंदणी क्रमांकाचे (नंबर प्लेट) छायाचित्र काढून ते आपल्या नात्यातील जवळची व्यक्ती, मित्र यांना पाठवावे

Before the trip, Catch a photograph of the auto rickshaw registration number | प्रवासापूर्वी रिक्षा, टॅक्सीच्या नोंदणी क्रमांकाचे छायाचित्र काढा, परिवहनमंत्री  मंत्री दिवाकर रावते यांचे आवाहन

प्रवासापूर्वी रिक्षा, टॅक्सीच्या नोंदणी क्रमांकाचे छायाचित्र काढा, परिवहनमंत्री  मंत्री दिवाकर रावते यांचे आवाहन

Next

मुंबई - रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये प्रवास करताना प्रवाशांनी आणि विशेष करुन महिला प्रवाशांनी संबंधित वाहनांच्या नोंदणी क्रमांकाचे (नंबर प्लेट) छायाचित्र काढून ते आपल्या नात्यातील जवळची व्यक्ती, मित्र यांना पाठवावे, जेणेकरुन आपल्या प्रवासाची माहिती इतरांस होईल व सुरक्षेच्या दृष्टिने त्याचा उपयोग होईल, असे आवाहन परिवहन मंत्री तसेच राज्य रस्ते सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे. 

बीकेसीतील रिक्षाचालकाच्या मुजोरीची गंभीर दखल, परवाना रद्द, गुन्हा दाखल करण्याचे आदेश

वांद्रे - कुर्ला काॅम्प्लेक्स येथे आज एका रिक्षाचालकाने प्रवाशाकडून अतिरिक्त भाडे आकारण्याचा प्रयत्न केला. पण ते देण्यास संबंधीत प्रवाशाने नकार दिल्यानंतर वादावादी झाली आणि रिक्षाचालकाने प्रवाशास मारहाण केली. याचा व्हीडीओ समाज माध्यमांमधून व्हायरल झाला आहे. मंत्री श्री. रावते यांनी या घटनेची तातडीने गंभीर दखल घेतली. या रिक्षाचालकावर कारवाई करण्याच्या सूचना परिवहन विभागाच्या अधिकार्यांना दिल्या. त्यानुसार संबंधीत रिक्षा चालकावर कारवाई करण्यात आली असून त्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच संबंधीत रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही मंत्री श्री. रावते यांनी दिले आहेत. 

या घटनेच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षेच्या दृष्टीने प्रवास सुरु करण्यापूर्वी रिक्षा, टॅक्सीच्या नोंदणी क्रमांकाचे (नंबर प्लेट) छायाचित्र काढावे, असे आवाहनही मंत्री श्री. रावते यांनी केले आहे. 

 प्रवास करताना बऱ्याच वेळा प्रवाशांच्या आणि विशेष करुन महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. काही गुन्ह्याच्या स्वरुपाच्या घटनाही  घडतात. चालकांकडून बाचाबाची, धक्काबुक्की किंवा मारहाणीसारख्या आजच्यासारख्या काही गंभीर घटना घडतात. तसेच सार्वजनिक वाहनात कागदपत्रे, मौल्यवान वस्तू, बॅग - पर्स इत्यादी प्रकारचे साहित्य विसरल्यास किंवा वाहनचालकाशी बाचाबाचीसारखी घटना घडल्यास संबंधीत वाहनाची माहिती आपल्याकडे असणे आवश्यक असते. तसेच दुर्दैवाने अपघात झाल्यास त्याचीही माहिती नातेवाईकांना लवकर मिळत नाही. अशा वेळी आपल्या प्रवासाची माहिती आपल्या जवळच्या व्यक्तीस असल्यास सुरक्षेच्या दृष्टिने त्याची मदत होऊ शकते. यासाठी प्रवाशांनी प्रवास सुरु करण्यापूर्वी संबंधित सार्वजनिक वाहन, रिक्शा, टॅक्सी यांच्या नोंदणी क्रमांकाचे (नंबर प्लेट) छायाचित्र आपल्या मोबाईवर घेऊन ते जवळच्या नातेवाईकास किंवा मित्रास व्हाॅट्सअॅप किंवा इतर समाज माध्यमांद्वारे पाठवावे, असे आवाहन मंत्री श्री.रावते यांनी केले आहे. प्रवास सुरक्षीतरित्या संपल्यानंतर संबंधीत छायाचित्र नष्ट करणे (डिलीट करणे) आवश्यक आहे.

Web Title: Before the trip, Catch a photograph of the auto rickshaw registration number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.