नव्या मेट्रो प्रकल्पांची गाडी लवकरच रुळावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 03:08 AM2018-11-23T03:08:22+5:302018-11-23T03:08:39+5:30

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई महानगराच्या कार्यक्षेत्रात वाढ केली असून आता यात पूर्ण पालघर तालुका, ...

 The train of new metro projects on the road soon | नव्या मेट्रो प्रकल्पांची गाडी लवकरच रुळावर

नव्या मेट्रो प्रकल्पांची गाडी लवकरच रुळावर

Next

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई महानगराच्या कार्यक्षेत्रात वाढ केली असून आता यात पूर्ण पालघर तालुका, वसई तालुका आणि रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर तालुक्यांचा उर्वरित भाग समाविष्ट केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बुधवारी झालेल्या बैठकीत एमएमआरडीएने मेट्रोच्या तीन नव्या प्रकल्पांचीही घोषणा केली. त्यामुळे मेट्रोची गाडी रुळावर येण्यासह नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
मेट्रो मार्गिका १०, ११, १२ अशा तीन मेट्रो प्रकल्पांना एमएमआरडीए बैठकीत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आरामदायी प्रवासासोबतच लोकांचा प्रवासाला लागणारा वेळही वाचेल.

येथे एमएमआरडीए देणार विशेष लक्ष
मेट्रो मार्गाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या हरित धोरणाचा शुभारंभ.
पूर्णपणे एलईडीवर आधारित विजेचा वापर असणाऱ्या हरित मेट्रो स्थानकांचा विकास.
सर्व उन्नत स्थानकांमध्ये सौरऊर्जेचा वापर, तसेच सर्व डेपो, नियंत्रण केंद्रे आणि मेट्रो गाड्यांमध्ये हरित तंत्रज्ञानाचा वापर.

बुलेट ट्रेन वांद्रे-कुर्ला स्थानकांशी जोडणार
जागतिक व्यापार सेवा केंद्र आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग वांद्रे-कुर्ला स्थानकाशी जोडण्याचा महत्त्वाचा निर्णयही बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
या कामासाठी हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनला अनुक्रमे ४.५ हेक्टर आणि ०.९ हेक्टर जागेची आवश्यकता आहे.
हे दोन्ही प्रकल्प एकत्र आल्याने वांद्रे-कुर्ला संकुल गतिमान संपर्क क्षेत्रात येणार आहे.

Web Title:  The train of new metro projects on the road soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो