उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पर्यटकांची ‘टूरटूर’! काश्मीर, गोव्याला अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 07:00 AM2018-04-16T07:00:15+5:302018-04-16T07:00:15+5:30

शाळेच्या परीक्षा संपल्यामुळे मुंबईकरांना ओढ लागली आहे, ती फिरायला जाण्याची. म्हणूनच बुकिंग जोरात सुरू असून, काश्मीर, गोवा या नेहमीच्या पर्यटनस्थळांसह आखाती देशांमध्ये कझाकिस्तान, इस्तांबुल अशा हटक्या पर्यटनस्थळांकडे पर्यटक आकर्षित होऊ लागले आहेत.

 Tourists 'tourist' due to summer vacations! Kashmir, Goa more likes | उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पर्यटकांची ‘टूरटूर’! काश्मीर, गोव्याला अधिक पसंती

उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पर्यटकांची ‘टूरटूर’! काश्मीर, गोव्याला अधिक पसंती

Next

- चेतन ननावरे
मुंबई -  शाळेच्या परीक्षा संपल्यामुळे मुंबईकरांना ओढ लागली आहे, ती फिरायला जाण्याची. म्हणूनच बुकिंग जोरात सुरू असून, काश्मीर, गोवा या नेहमीच्या पर्यटनस्थळांसह आखाती देशांमध्ये कझाकिस्तान, इस्तांबुल अशा हटक्या पर्यटनस्थळांकडे पर्यटक आकर्षित होऊ लागले आहेत.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या माहितीनुसार, गतवर्षी २ कोटी ३० लाख पर्यटकांनी परदेशवारी केली होती, तर बाहेरील देशांतून भारतात आलेल्या पर्यटकांची संख्या १ कोटींवर पोहोचली होती. परदेशी पर्यटकांचा आकडा २ कोटींच्या घरात जाण्यासाठी पर्यटन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. नुकत्याच केंद्रीय पर्यटन विकास समितीच्या बैठकीत तसा सूर उमटल्याची माहितीही समितीमधील एका सदस्याने दिली.
देशांतर्गत टूरमध्ये गोवा, अंदमान आणि काश्मीरला पर्यटकांना अधिक पसंती देताना दिसत आहेत, तर राज्यात फिरणाऱ्या पर्यटकांची पावले महाबळेश्वर, माथेरान, खंडाळा आणि लोणावळ्याकडे वळत आहेत.

येथे जिभेचे चोचले पुरविले जातात!
अंदमान आणि भूतानमध्ये असलेल्या जेवणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बहुतेक टूर आॅपरेटर स्वत:चा आचारी घेऊन जात असल्याचा ट्रेंड आहे. विशेष महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी मराठमोळ्या जेवणाची व्यवस्था केली जात असल्याचेही राजीव काळे यांनी सांगितले.

इंडोनेशिया ‘बीच’ची भुरळ!
गेल्या काही वर्षांत इंडोनेशियामधील समुद्रकिनाºयांची भारतीयांना भुरळ पडल्याचे दिसते. २०१७ मध्ये ४ लाख ८५ हजार ३१४ भारतीय पर्यटकांनी इंडोनेशियाला भेट दिली. इंडोनेशियाला भेट देणाºया पर्यटक संख्येत भारताचा सहावा क्रमांक आहे. २०१६ सालच्या तुलनेत हा आकडा २८.८० टक्क्यांनी वाढला आहे. येथील कुटा बीच, पिंक बीच, सेनारू धबधबा आणि बेनांग केलम्बु धबधबा पर्यटकांना विशेष लक्ष वेधून घेतो.

कराचा बोझा कमी करण्याची गरज
हॉटेल उद्योगावर असलेल्या २८ टक्के जीएसटीमुळे परदेशी पर्यटकांची संख्या रोडावत असल्याची माहिती, केंद्रीय पर्यटत समितीचे सदस्य करण आनंद यांनी दिली. ते म्हणाले, पर्यटनात भारताचे स्पर्धक असलेल्या देशांत कराचा बोझा हा ५ ते १८ टक्क्यांपर्यंत आहे.
आखाती देशांना पसंती!
युरोप आणि आशिया खंडाव्यतिरिक्त नव्याने उदयाला आलेल्या आणि काही कारणास्तव बंद असलेले मात्र, पुन्हा सुरू झालेल्या हटक्या पर्यटनस्थळांनाही पसंती मिळत असल्याचे जाणकार सांगतात. त्यात प्रामुख्याने इजिप्त, इस्तांबुल, टर्की, कझाकिस्तान, युक्रेन, रशिया अशा देशांचा समावेश आहे.

Web Title:  Tourists 'tourist' due to summer vacations! Kashmir, Goa more likes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.