आज ठरणार मनसेचे ते सहा नगरसेवक नेमके कोणासोबत ? मनसेने जारी केला व्हीप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 01:47 PM2017-10-26T13:47:39+5:302017-10-26T13:52:05+5:30

मनसे सोडून शिवसेनेमध्ये गेलेले सहा नगरसेवक नेमके कोणासोबत आहेत ते काहीवेळातच स्पष्ट होणार आहे.

Today, with whom are the MNS's six corporators? MAS released Vepp | आज ठरणार मनसेचे ते सहा नगरसेवक नेमके कोणासोबत ? मनसेने जारी केला व्हीप

आज ठरणार मनसेचे ते सहा नगरसेवक नेमके कोणासोबत ? मनसेने जारी केला व्हीप

Next
ठळक मुद्देशिवसेनेत गेलेल्या सहापैकी चार नगरसेवक पुन्हा मनसेत प्रवेश करणार असल्याची काल चर्चा सुरु होती. परमेश्वर कदम, हर्षला मोरे, दत्ताराम नरवणकर, अर्चना भालेराव या चार नगरसेवकांच्या नावाची चर्चा होती.

मुंबई - मनसे सोडून शिवसेनेमध्ये गेलेले सहा नगरसेवक नेमके कोणासोबत आहेत ते काहीवेळातच स्पष्ट होणार आहे. आज मुंबई महानगरपालिकेची बैठक होणार आहे. या बैठकीआधी मनसेकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. पक्षाच्या सूचनेशिवाय महापालिका सभागृहात मतदान करु नये. कोणी मतदान केल्यास कारवाई केली जाईल असे या व्हीपमध्ये म्हटले आहे. नेमके हे नगरसेवक कोणासोबत आहेत ते आज स्पष्ट होईल. 

शिवसेनेत गेलेल्या सहापैकी चार नगरसेवक पुन्हा मनसेत प्रवेश करणार असल्याची काल चर्चा सुरु होती. परमेश्वर कदम, हर्षला मोरे, दत्ताराम नरवणकर, अर्चना भालेराव या चार नगरसेवकांच्या नावाची चर्चा होती. दरम्यान काल शिवसेनेकडून परिपत्रक प्रसिद्ध करुन या वृत्ताचे खंडन करण्यात आले होते. मनसेतून आलेले नगरसेवक आपल्यासोबतच असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. 

कोणताच नगरसेवक मनसेत जाणार नाही. आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच राहणार असे नगरसेवक दिलीप लांडे यांनी सांगितले. दिलीप लांडे मुंबई महापालिकेतील मनसेचे गटनेते होते. त्यांनीच या सर्व नगरसेवकांना शिवसेनेमध्ये आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. 

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दोन नगरसेवकांवर लाचलुचपत प्रतिबंध विभाग अर्थात एसीबी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. परमेश्वर कदम आणि दिलीप लांडे या नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मनसेत राहिलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे आणि भाजपाने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार एसीबीकडून कारवाई केली जाणार असल्याचं बोललं जातं आहे.
 

Web Title: Today, with whom are the MNS's six corporators? MAS released Vepp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.