मुंबई : मध्य रेल्वे तसेच हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर मात्र रविवारी मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी १०.१५ ते दुपारी ३.१५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे डाऊन जलद मार्गावरील वाहतूक डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येईल.
हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/ वांद्रे स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गांवर सकाळी ११.४० ते ४.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल ते कुर्ला स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.