Mumbai Train Update: आज रात्रकालीन पाच तासांचा ब्लॉक, हार्बर मार्गावरील वांद्रे-अंधेरी लोकल सेवा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 06:58 AM2019-05-08T06:58:30+5:302019-05-08T06:58:48+5:30

पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे वांद्रे स्थानकातील गर्डर हटविण्याचे काम करण्यात येणार आहे.

Today, the Bandra-Andheri local services on the Harbor-Bandar Harbor line are closed for five hours | Mumbai Train Update: आज रात्रकालीन पाच तासांचा ब्लॉक, हार्बर मार्गावरील वांद्रे-अंधेरी लोकल सेवा बंद

Mumbai Train Update: आज रात्रकालीन पाच तासांचा ब्लॉक, हार्बर मार्गावरील वांद्रे-अंधेरी लोकल सेवा बंद

googlenewsNext

मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे वांद्रे स्थानकातील गर्डर हटविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवार, ८ मे रोजी मध्यरात्री ११ वाजून ३० मिनिटांपासून ते ९ मे रोजी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत हार्बरच्या दोन्ही मार्गांवर मेजर ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे या मार्गावरील लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून अंधेरीकडे रात्री १० वाजून ३७ मिनिटांनंतर आणि ११ वाजून ४ मिनिटांनंतर हार्बर मार्गाहून सीएसएमटीकडे येणाऱ्या सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटीहून वांद्रे दिशेकडे जाणारी रात्री १० वाजून ५४ मिनिटांची, रात्री १२ वाजून ३६ मिनिटांची लोकल आणि सीएसएमटीहून अंधेरी दिशेकडे जाणारी रात्री ११ वाजून २ मिनिटांची, रात्री ११ वाजून ३८ मिनिटांची लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
अंधेरीहून सीएसएमटीकडे येणारी रात्री ११ वाजून ३९ मिनिटांची, रात्री १२ वाजून २८ मिनिटांची लोकल रद्द करण्यात आली आहे. वांद्रेहून सीएसएमटीकडे येणारी रात्री ११ वाजून ३२ मिनिटांची लोकल रद्द करण्यात आली आहे. हार्बर मार्गावरील प्रवासी रात्री १० वाजून ३० मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत मध्य रेल्वे मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गाने प्रवास करू शकतात.
वांद्रे स्थानकातील गर्डर हटविण्याच्या कामासाठी घेण्यात येणाºया या ब्लॉकचा परिणाम पश्चिम रेल्वे मार्गावरही होईल. ब्लॉक काळात पश्चिम रेल्वे मार्गावरील दोन्ही दिशेकडील जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रुझ ते माहिम स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील.

Web Title: Today, the Bandra-Andheri local services on the Harbor-Bandar Harbor line are closed for five hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.