पाळीव प्राण्यांसाठी तीन स्वतंत्र शवदाहिन्या; अर्थसंकल्पात ११.५० कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 05:11 AM2019-02-05T05:11:59+5:302019-02-05T05:12:32+5:30

मुंबईतील पाळीव प्राण्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने हद्दीतील मृत पावलेल्या पाळीव श्वान, मांजर आणि भटके श्वान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईतील तीन स्वतंत्र शवदाहिनी उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.

Three independent cremation grounds for pets; A provision of Rs.11.50 crores for the budget | पाळीव प्राण्यांसाठी तीन स्वतंत्र शवदाहिन्या; अर्थसंकल्पात ११.५० कोटींची तरतूद

पाळीव प्राण्यांसाठी तीन स्वतंत्र शवदाहिन्या; अर्थसंकल्पात ११.५० कोटींची तरतूद

Next

मुंबई  - मुंबईतील पाळीव प्राण्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने हद्दीतील मृत पावलेल्या पाळीव श्वान, मांजर आणि भटके श्वान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईतील तीन स्वतंत्र शवदाहिनी उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. याकरिता, यंदाच्या अर्थसंकल्पात ११.५० कोटींची तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे, यंदाच्या अर्थसंकल्पात पशुवैद्यकीय आरोग्य खात्याकरिता निधीत भरीव वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी १३ कोटी असणारा हा निधी यंदा ३५ कोटी ६० लाखांचा करण्यात आला आहे.

पालिकेच्या वतीने खार येथील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ पशुवैद्यकीय मुख्यालय बांधण्याचा प्रकल्प कार्यान्वित आहे. यात पाच मजली इमारतीचा समावेश असून तळमजल्यावर खार पशुवैद्यकीय दवाखाना असेल. पहिला व दुसरा मजला आरोग्य चिकित्सालयाकरिता राखीव असेल. तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे मुख्यालय व पाचव्या मजल्यावर प्राण्यांपासून माणसांना लागण होणाºया रोगांच्या निदानाकरिता प्रयोगशाळा राखीव असणार आहे. याकरिता २०१८-१९
दोन कोटींची तरतूद करण्यात
आली आहे. पालिका प्रशासनातर्फे एप्रिल २०१९ मध्ये भटक्या मांजरींचे निर्बीजीकरण करण्याचा कार्यक्रम
हाती घेतला आहे. त्यासाठी १ कोटी एवढ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
महालक्ष्मीला पशुवैद्यकीय रुग्णालय
महालक्ष्मी येथे सार्वजनिक-खासगी भागीदरी तत्त्वावर ‘स्टेट आॅफ दी आर्ट’ पशु रुग्णालय उभारले जाणार आहे. त्याची क्षमता ३०० प्राण्यांची असून यात रोगनिदान करण्याची अद्ययावत उपकरणे व रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली जाईल. या रुग्णालयात भटक्या प्राण्यांवर मोफत उपचार व कमी उत्पन्न असणाºया मालकांच्या पाळीव प्राण्यांना उपचारांत सवलत दिली जाईल.
पशुवधगृहाचे आधुनिकीकरण
देवनार पशुवधगृहाच्या आधुनिकीकरणाचा ५०० कोटींचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. दोन टप्प्यांत आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू असून पहिल्या टप्प्यातील कामासाठी ४१ कोटींची निविदा प्रसिद्ध केली आहे. पहिल्या टप्प्याचा अंदाजित खर्च ३०० कोटींचा आहे. तर यंदाच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी २० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

श्वान मालकांकडून १ लाख ७५ हजारांची दंडवसुली
श्वान मालकांना त्यांच्या पाळीव श्वानांना बाहेर फिरायला घेऊन जाताना सोबत पुप-स्कूपर घेऊन जाणे पालिकेने अनिवार्य केले होते. हा नियम मोडणाºया मालकांकडून ५०० रुपये इतका दंड आकारण्यात आला. जानेवारी महिन्यात या नियमांचे पालन न केलेल्या मालकांकडून १ लाख ७५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

Web Title: Three independent cremation grounds for pets; A provision of Rs.11.50 crores for the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.