मुंबईतील पुलांचे वर्षभरात तीनदा आॅडिट, स्वतंत्र पूल निरीक्षण प्राधिकरण घेणार आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 06:35 AM2019-03-22T06:35:01+5:302019-03-22T06:35:27+5:30

मुंबई : दोन वर्षांपूर्वी दुरुस्ती व स्ट्रक्चरल आॅडिट करूनही छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक येथील पादचारी पूल धोकादायक असल्याचे उजेडात ...

Three bridges of the bridge in Mumbai will be reviewed by the independent pool inspection authority | मुंबईतील पुलांचे वर्षभरात तीनदा आॅडिट, स्वतंत्र पूल निरीक्षण प्राधिकरण घेणार आढावा

मुंबईतील पुलांचे वर्षभरात तीनदा आॅडिट, स्वतंत्र पूल निरीक्षण प्राधिकरण घेणार आढावा

Next

मुंबई : दोन वर्षांपूर्वी दुरुस्ती व स्ट्रक्चरल आॅडिट करूनही छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक येथील पादचारी पूल धोकादायक असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून यापुढे दर तीन महिन्यांनी (तिमाही, सहामाही, वार्षिक) पुलांचे आॅडिट करण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार सुरू आहे. स्वतंत्र पूल निरीक्षण प्राधिकरणामार्फत या आॅडिटचा आढावा नियमित घेतला जाणार आहे.

हिमालय पादचारी पूल १४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी कोसळून या दुर्घटनेत सहा लोकांचा मृत्यू झाला. तर ३१ पादचारी जखमी झाले. स्ट्रक्चरल आॅडिटरने किरकोळ दुरुस्ती सुचविलेला पूल पडल्यामुळे या दुर्घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. या प्रकरणी स्ट्रक्चरल आॅडिटर नीरज देसाईला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच मुंबईतील सर्व पुलांचे पुन्हा एकदा आॅडिट करण्यात येणार आहे.
पुलांची देखभाल व दुरुस्ती नियमित होण्यासाठी स्वतंत्र पूल निरीक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पुलांचे तिमाही, सहामाही आणि वार्षिक आॅडिट करण्याचा विचार प्रशासन करीत आहे. यासंदर्भातील धोरण आखण्याचे काम पूल प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे हे या प्राधिकरणाची कामे व जबाबदारी निश्चित करून एका महिन्यात अहवाल देतील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

जबाबदारी प्राधिकरणावर

मुंबईतील पुलांची दुरुस्ती, देखभालीच्या कामासाठी पूल निरीक्षण प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. मुख्य पूल निरीक्षक या प्राधिकरणाचे प्रमुख असणार आहेत.
कोणत्या पुलांची तपासणी करायची? कशी करायची? त्याचे निकष काय? पुलांची देखभाल करण्यासाठी नियुक्त अभियंत्यांची जबाबदारी निश्चित करणे, अहवाल कोणत्या स्वरूपात असावा? तसेच पूल धोकादायक असल्यास तत्काळ कोणती पावले उचलावीत याबाबतचे सर्व निर्णय घेण्याची जबाबदारी या प्राधिकरणावर आहे.

Web Title: Three bridges of the bridge in Mumbai will be reviewed by the independent pool inspection authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.