सदोष प्रवेशप्रक्रियेमुळे हजारो विद्यार्थी अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:12 AM2018-08-21T01:12:10+5:302018-08-21T01:12:31+5:30

विधी अभ्यासक्रमाचा घोळ; गुणवत्ता असूनही प्रवेशाला मुकणार

Thousands of students disqualified due to inaccurate admission process | सदोष प्रवेशप्रक्रियेमुळे हजारो विद्यार्थी अपात्र

सदोष प्रवेशप्रक्रियेमुळे हजारो विद्यार्थी अपात्र

Next

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : विधी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता महाराष्ट्र सीईटी सेल व एमकेसीएलने अवलंबविलेल्या सदोष पद्धतीमुळे हजारो गुणवत्ताधारक विद्यार्थी प्रवेशाला मुकणार आहेत.
विधी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता सीईटी सेलने १७ जून रोजी प्रवेश पात्रता परीक्षा घेतली होती. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना महा-ई-प्रवेश या संकेतस्थळावर अर्ज करण्यास सांगितले गेले. मात्र या संकेतस्थळावर प्रवेशाकरता एक लिंक आणि कॉलेजचे पर्याय देण्यासाठी दुसऱ्या फॉर्मची लिंक देण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. अनेकांनी विकल्पाचा फॉर्मच न भरल्याने त्यांचे अर्ज नाकारण्यात आले.
केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशासाठी मूळ अर्जामध्येच पर्याय मागितले जातात. परंतु विधीच्या बाबतीत प्रवेश आणि विकल्पासाठी स्वतंत्र अर्ज मागविल्याने गोंधळ झाला.

विद्यार्थी संतप्त; शैक्षणिक नुकसान झाले
अपात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेवरच बोट ठेवले. ही पद्धत सदोष असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. प्रक्रिया क्लिष्ट करून सीईटी सेल व एमकेसीलएलने हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्याचा त्यांचा आरोप आहे.

Web Title: Thousands of students disqualified due to inaccurate admission process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.