‘त्या’ तीन नगरसेवकांचे पद जाणार; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 05:10 AM2019-04-26T05:10:32+5:302019-04-26T05:10:56+5:30

मुंबई महानगरपालिकेच्या त्या तीन अपात्र नगरसेवकांना जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला.

'Those' will go to the post of three corporators; The result of the Bombay High Court is retained by the Supreme Court | ‘त्या’ तीन नगरसेवकांचे पद जाणार; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून कायम

‘त्या’ तीन नगरसेवकांचे पद जाणार; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून कायम

Next

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या त्या तीन अपात्र नगरसेवकांना जात प्रमाणपत्र प्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कामय ठेवल्याने या तिघांचाही नगरसेवक पद रद्द होईल.

मुंबई महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका केशरबेन मुरजी पटेल (प्रभाग क्रमांक ७६) आणि नगरसेवक मुरजी कानजी पटेल (प्रभाग क्रमांक ८१) तसेच काँग्रेसचे नगरसेवक राजपती बरगून यादव (प्रभाग क्रमांक २८) अशी या तीन नगरसेवकांची नावे आहेत. त्यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरवत जात पडताळणी समितीने आॅगस्ट २०१७ रोजी ते रद्द केले. या निर्णयाला नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने सदर अपील २ एप्रिलच्या सुनावणीत फेटाळून लावत जात पडताळणी समितीने दिलेला निर्णय कायम ठेवला.

मुंबई उच्च न्यायालयाने सदरचे अपील फेटाळल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ५ एप्रिल रोजी सदर तिन्ही नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश काढला. १० एप्रिल रोजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सर्वसाधारण सभेत या आदेशाची घोषणा करून त्यावर शिक्कामोर्तब केले.

मात्र, या तिघांनीही मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली. बुधवारी तीन तास चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांनी तिघांचेही अपील फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवला. त्यामुळे आता या तिघांचेही नगरसेवक पद रद्द होईल.

सर्वोच्च न्यायालयात केशरबेन आणि अन्य नगरसेवकांच्या वतीने वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी, सुशील करंजकर, के. एन. राय यांनी तर नगरसेवकांच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले नितीन बंडोपंत सलाग्रे, संदीप नाईक व शंकर हुंडारे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील शेखर नाफडे, वरिष्ठ वकील आर. बसंत, सुधांशू चौधरी आणि चिंतामणी भणगोजी यांनी काम पाहिले.

यांना मिळणार संधी
तीन नगरसेवकांचे पद रद्द झाल्याने आता दुसºया क्रमांकावर असलेल्या काँग्रेसच्या नितीन बंडोपंत सलाग्रे (प्रभाग कमांक ७६) तसेच शिवसेनेचे संदीप राजू नाईक (प्रभाग क्रमांक ८१) आणि एकनाथ ज्ञानदेव हुंडारे (प्रभाग क्रमांक २८) यांचा नगरसेवक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: 'Those' will go to the post of three corporators; The result of the Bombay High Court is retained by the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.