मुंबई : राज्यभरातील शाळांमध्ये बुधवारी इयत्ता १ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांचा मूल्यमापन परीक्षेचा पहिला पेपर झाला. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील महापालिकांच्या काही शाळांमध्ये गोंधळ झाला. काही ठिकाणी प्रश्नपत्रिका कमी पडल्या तर काही शाळांमध्ये पर्यवेक्षणासाठी शिक्षक नव्हते. पण, थोड्याच वेळात हा गोंधळ निस्तरण्यात आल्याने पुढील परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती शिक्षकांकडून मिळाली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाºया शाळांमध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत मूल्यमापन चाचणी घेण्यात येते. ८ ते ११ नोव्हेंबरदरम्यान राज्यभरातील शाळांमध्ये एकाचवेळी म्हणजे सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत प्रथम भाषेची परीक्षा घेण्यात आली. पण, महापालिकेच्या शाळांमध्ये परीक्षेच्या पहिल्याच दिवशी गोंधळ झाला. काही शाळांमध्ये प्रश्नपत्रिका कमी पडल्या. पण, विद्यार्थ्यांचा परीक्षेचा वेळ फुकट जाऊ नये म्हणून काळी वेळातच इतर शाळांमधून प्रश्नपत्रिकांची व्यवस्था करण्यात आली. तर काही ठिकाणी पर्यवेक्षक कमी होते.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.