VIDEO- हे काय ? मुंबईत दोन गेट वे ऑफ इंडिया आहेत ?

By अोंकार करंबेळकर | Published: December 4, 2017 02:46 PM2017-12-04T14:46:26+5:302017-12-04T17:44:45+5:30

आजच्याच दिवशी म्हणजे 4 डिसेंबर 1924 रोजी गेट वे ऑफ इंडियाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते.

There are two Gate Way of India in Mumbai? | VIDEO- हे काय ? मुंबईत दोन गेट वे ऑफ इंडिया आहेत ?

VIDEO- हे काय ? मुंबईत दोन गेट वे ऑफ इंडिया आहेत ?

googlenewsNext
ठळक मुद्देब्रिटीश काळामध्ये बांधलेल्या इमारतींचे स्थापत्यविशारद ब्रिटिश असलेले तरी बाकी अभियंते नेटिव्ह असत. अनेक इमारतींचे मुख्य काम भारतीय अभियंत्यांनी केले आहे.

मुंबई- मुंबई म्हटलं की, काही महत्त्वाच्या वास्तू डोळ्यांसमोर येतात. छ. शिवाजी टर्मिनस, महानगरपालिकेची मुख्य इमारत किंवा हायकोर्टाची इमारत. यामध्ये मुंबईला स्वतःची ओळख निर्माण करुन देणारी वास्तूचा समावेश होतो तो म्हणजे गेट वे आफ इंडियाच्या इमारतीचा.  1924 साली उद्घाटन झालेली ही इमारत आजही तितक्याच दिमाखात उभी आहे. भारतात येणाऱ्या व्हॉइसरॉय आणि गव्हर्नर मंडळींचे स्वागत करण्यासाठी या इमारतीचा वापर केला जातो.

(अपोलो बंदर येथे गेट वे ऑफ इंडियाची प्लास्टर ऑफ पॅरिसने तयार केलेल्या कमानीमध्ये राजे पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांचे स्वागत करण्यात आले.)

1911 साली राजे पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या स्वागतासाठी दिल्ली दरबारात उपस्थित राहण्यासाठी भारतात येणार होते. मात्र त्यांचे स्वागत काही गेट वे ऑफ इंडिया खाली होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांचे स्वागत करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसने तयार केलेल्या प्रतिकृतीमध्येच त्यांचं स्वागत केलं जातं. त्यानंतर 31 मार्च 1913 रोजी गेट वे ऑफ इंडियाचा पाया रचला गेला. जॉर्ज विटेट या बांधकामाचे मुख्य स्थापत्यविशारद होते तर मुख्य ओव्हरिसय़र म्हणून रावबहादूर देसाई यांनी काम केले. 10 मीटर पायावर उभ्या असलेल्या इमारतीची उंची 26 मीटर इतकी आहे. गेट वेच्या बांधकामासाठी सॅंडस्टोनचा वापर केला आहे. समुद्रावरुन येणारी खारी हवा, लाटा, मुंबईचा जोरदार पाऊस आणि उन्हाचा मारा सहन करुनही ही इमारत टिकून आहे. ही इमारत बांधण्यासाठी 21 लाख रुपयांचा खर्च आला होता.

1915 पासून गेट वे ऑफ इंडियाचे काम जोरात सुरु झाले, 4 डिसेंबर 1924 रोजी या वास्तूचे उद्घाटन व्हॉइसरॉय रिडिंग यांच्या हस्ते करण्यात आले. गेली नऊ दशके या वास्तूने मुंबईला ओळख निर्माण करुन दिली आहे. त्यानंतर प्रत्येक गव्हर्नरचे स्वागत याच कमानीमध्ये करण्यात येऊ लागले. स्वातंत्र्यानंतर 28 फेब्रुवारी 1948 रोजी सोमरसेट लाइट इन्फ्रंट्रीने येथूनच भारताचा निरोप घेतला. 

दुसऱ्या गेट वे ऑफ इंडियाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? 
ब्रिटीश काळामध्ये बांधलेल्या इमारतींचे स्थापत्यविशारद ब्रिटिश असलेले तरी बाकी अभियंते नेटिव्ह असत. अनेक इमारतींचे मुख्य काम भारतीय अभियंत्यांनी केले आहे. गेट वे ऑफ इंडियाचे काम रावबहादूर देसाई यांनी केले होतेय रावबहादूर देसाई यांचे मूळ नाव यशवंतराव हरिश्चंद्र देसाई असे होते. देसाई यांनी या कामाचे ओव्हरसियर होते. त्यांच्या पर्यवेक्षणाखाली जनरल पोस्ट ऑफिस, कावसजी जहॉंगिर हॉल, कस्टम हाऊस अशी उत्तमोत्तम कामे झाली होती. गेट वे ऑफ इंडियाचे बांधकाम करण्यापुर्वी त्यांनी त्याच दगडाची एक सहा फुट उंचीची प्रतिकृती तयार करुन घेतली होती. ही प्रतिकृती त्यांनी वाड्याच्या अंगणात ठेवली होती. आज त्यांच्या वाड्याच्या जागी इमारत तयार बांधण्यात आलेली आहे. मात्र रावबहादूर देसाई यांच्या वंशजांनी आजही ही प्रतिकृती जपून ठेवलेली आहे.

आणखी वाचा-
1857 चे स्वातंत्र्यसमर; गंगा केडिया आणि सय्यद हुसेन यांचा मृत्यूदंड

एलफिन्स्टन रोड स्टेशनवाले ‘एलफिन्स्टन’ कोण होते?

Web Title: There are two Gate Way of India in Mumbai?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.