मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात दस-याच्या शुभमुहूर्तावर सराफ बाजारापासून वाहनांच्या शोरूममध्ये शनिवारी गर्दी असल्याचे दिसून आले. सोन्याची खरेदी-विक्री जोरात होत असतानाच मोटार खरेदीतही वाढ नोंदवली गेली आहे. हा उत्साह आता दिवाळीपर्यंत कायम राहील, असे सांगण्यात येते. मात्र दुसरीकडे
घरांच्या खरेदी-विक्रीला मात्र थंड
प्रतिसाद मिळत आहे, असे विकासकांकडून सांगण्यात आले.
सोन्यावरील आयात शुल्क, जीएसटी आणि खरेदीच्या विविध टप्प्यांवर
ग्राहकांना दाखवावे लागणारे ओळखपत्र; यामुळे ग्राहक गोंधळून गेलेले असतानाही यंदा दसºयाला सोने व चांदी यांची
खरेदी मात्र मोठ्या प्रमाणात झाल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे.
अक्षय्य तृतीयेनंतर मौल्यवान धातूंचा
बाजार सावरत आहे.
सरकारने जेम्स-ज्वेलरी उद्योगाला ३ टक्के कराच्या मर्यादेत आणण्याचा
निर्णय घेतल्यानंतर या उद्योगावरचा सर्वसामान्यांचा विश्वास वाढण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, सणासुदीच्या काळात दागिन्यांच्या विक्रीत ३० ते ३५
टक्के वाढ होत आहे, अशी माहिती
सराफांनी दिली. वाहन बाजारात
दुचाकींच्या तुलनेत मोटारींची खरेदी जोरात सुरू असून, मागील वर्षी मात्र याच्या उलट स्थिती होती.
दुसरीकडे, दसºयाच्या निमित्ताने घरांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. यावर्षी मात्र नोटाबंदी आणि जीएसटीमुळे खरेदी-विक्रीत घट झाली आहे.

घरांना मागणीच नाही
विकासकांचे मत असे आहे की, आता गृहप्रकल्प हाती घेतला तरी कोणी घर घेण्यासाठी येत नाही. त्यामुळे बरेचशा विकासकांनी जुन्या प्रकल्पांचेच काम सुरू ठेवले आहे. जुन्या प्रकल्पांतील सर्व घरांची विक्री झालेली नाही, असे बिल्डर असोसिएशन आॅफ इंडियाचे ज्येष्ठ सदस्य आनंद गुप्ता यांनी सांगितले.