दिव्यांग मुलीवर बलात्कारप्रकरणी अंधेरीतून टेम्पो चालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 02:38 AM2019-05-18T02:38:12+5:302019-05-18T02:38:24+5:30

पीडित दिव्यांग तरुणीला त्याने अनेकदा अंधेरी परिसरात एकटे फिरताना पाहिले होते.

 The tempo driver arrested from the Andheri in connection with the rape of Divyang girl | दिव्यांग मुलीवर बलात्कारप्रकरणी अंधेरीतून टेम्पो चालकाला अटक

दिव्यांग मुलीवर बलात्कारप्रकरणी अंधेरीतून टेम्पो चालकाला अटक

Next

मुंबई : अडतीस वर्षीय दिव्यांग मुलीवर एका इसमाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या महिन्यात घडला होता. या प्रकरणी एका टेम्पो चालकाला अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. अरविंद गुप्ता असे त्याचे नाव असल्याचे समजते.
गुप्ता हा रोजंदारीवर एका गोदामात काम करतो. पीडित दिव्यांग तरुणीला त्याने अनेकदा अंधेरी परिसरात एकटे फिरताना पाहिले होते. त्याचाच फायदा घेत, २२ एप्रिल, २०१९ रोजी ती घराबाहेर उभी असताना तो तिच्याशी गप्पा मारू लागला. गोड बोलून त्याने तिला टेम्पोत बसविले आणि नंतर निर्जनस्थळी नेले. त्यानंतर, संधी साधत त्याने टेम्पोत तिच्यावर बलात्कार केला आणि पुन्हा तिच्या घराजवळ आणून सोडले. ती घरी परतल्यावर दोन दिवसांनंतर तिने तिच्या भाषेत तिच्यासोबत घडलेला प्रकार बहिणीला सांगितला. तेव्हा घरच्यांनी २८ एप्रिल, २०१९ला अंधेरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. तिला वैद्यकीय चाचणीसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. तपासादरम्यान पोलिसांनी जवळपास ५० सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले. त्यातून त्यांना गुप्ताच्या टेम्पोचा नंबर सापडला. त्यानुसार, अंधेरीच्या एमआयडीसी परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केली.

Web Title:  The tempo driver arrested from the Andheri in connection with the rape of Divyang girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.