पक्ष्यांच्या सुटकेसाठी टेलिस्कोपिक रॉड, मुंबई महापालिकेचा निर्णय, अग्निशमन जवानांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 03:07 AM2017-12-13T03:07:57+5:302017-12-13T03:08:07+5:30

झाड व विजेच्या तारेवर अडकलेल्या पक्ष्यांना सोडविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. आपत्तीसाठी सज्ज असणा-या या जवानांपैकी काहींना अशा मोहिमेत जीव गमवावा लागला.

Telescopic rod for the release of birds, decision of BMC, relief to fire fighters | पक्ष्यांच्या सुटकेसाठी टेलिस्कोपिक रॉड, मुंबई महापालिकेचा निर्णय, अग्निशमन जवानांना दिलासा

पक्ष्यांच्या सुटकेसाठी टेलिस्कोपिक रॉड, मुंबई महापालिकेचा निर्णय, अग्निशमन जवानांना दिलासा

Next

मुंबई : झाड व विजेच्या तारेवर अडकलेल्या पक्ष्यांना सोडविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. आपत्तीसाठी सज्ज असणा-या या जवानांपैकी काहींना अशा मोहिमेत जीव गमवावा लागला. त्यामुळे पक्ष्यांची सुटका करण्यासाठी टेलिस्कोपिक रॉड खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामुळे जवानांना दिलासा मिळणार आहे.
मुंबईत दररोज सुमारे साडेचार हजार दुर्घटना घडतात. यामध्ये प्रामुख्याने आगीचा समावेश असतो. आग लागणे या व्यतिरिक्त इमारत व दरड कोसळणे, अशा आपत्तींमध्ये अग्निशमन जवान आपला जीव धोक्यात घालून मदतकार्य करतात. मात्र, अशा आपत्तींव्यतिरिक्त झाडे व विजेच्या तारांमध्ये अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर असते. पक्ष्यांना सोडविण्याचे कोणतेच उपकरण नसल्याने बांबू अथवा झाड, इमारत आदीवर चढून जवान हे कार्य करीत असतात. पक्ष्यांना सोडविताना जवानांचा बळी गेल्याच्या काही घटना गेल्या काही वर्षांत घडल्या आहेत. याचे तीव्र पडसाद उमटताच महापालिकेने बाजारात शोध घेतला. अखेर टेलिस्कॉपिक रॉडच्या माध्यमातून हा प्रश्न सुटला आहे.
कार्बन फायबर व फायबर ग्लासपासून बनलेल्या व वजनाने हलक्या असलेल्या या रॉडच्या साहाय्याने यापुढे झाडे व विजेच्या तारांमध्ये अडकणाºया पक्ष्यांची सुटका करणे सोपे होणार आहे.

- टेलिस्कोपिक रॉड हे कार्बन फायबर व फायबर ग्लासपासून बनलेले व वजनाने हलके असतात. हा रॉड १६.५६ मीटर उंच असेल.
- असे ३५ रॉड खरेदी करून, ३३ अग्निशमन केंद्रात ठेवण्यात येणार आहेत. यासाठी पालिका ७७
लाख ५३ हजार रुपये मोजणार आहे.
- पक्ष्यांना सोडविण्याचे दररोज ५० कॉल अग्निशमन दलाकडे येत असतात. तर वार्षिक सुमारे १८ हजार कॉल याच संदर्भात
असतात.

डिसेंबर २०१३ -
मस्जीद बंदर येथील इमारतीच्या छतावर अडकलेल्या
कावळ्याचे प्राण वाचविताना उंचावरून पडून ३१ वर्षीय
उमेश पर्वेते या जवानाचा मृत्यू झाला.
फेब्रुवारी २०१७ -
मुंबई सेंट्रल स्थानकावरील तारखंडमध्ये अडकलेल्या पक्ष्याला सोडविताना शॉक लागून राजेंद्र भोजने या जवानाचा मृत्यू झाला.

Web Title: Telescopic rod for the release of birds, decision of BMC, relief to fire fighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.