‘टार्गेट’ मुंबई विमानतळ, अत्युच्च सुरक्षेवर सीआयएसएफचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 06:03 AM2018-07-09T06:03:54+5:302018-07-09T06:04:21+5:30

देशातील अत्यंत संवेदनशील विमानतळांपैकी एक असलेले मुंबई विमानतळ एरव्ही अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असले, तरी सध्या ते सीआयएसएफच्याही ‘टार्गेट’वर आहे.

'Target' Mumbai Airport, CISF's focus on high security | ‘टार्गेट’ मुंबई विमानतळ, अत्युच्च सुरक्षेवर सीआयएसएफचे लक्ष

‘टार्गेट’ मुंबई विमानतळ, अत्युच्च सुरक्षेवर सीआयएसएफचे लक्ष

Next

- खलील गिरकर
मुंबई  - देशातील अत्यंत संवेदनशील विमानतळांपैकी एक असलेले मुंबई विमानतळ एरव्ही अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असले, तरी सध्या ते सीआयएसएफच्याही ‘टार्गेट’वर आहे. तेथील सुरक्षेत आमूलाग्र बदल करत आधुनिक यंत्रणा, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची जोड देत ही सुरक्षा अभेद्य करण्यावर सध्या सीआयएसएफने लक्ष्य केंद्रीत केल्याची माहिती अतिवरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.
त्यासाठी तब्बल चार हजार प्रशिक्षित अधिकारी, कर्मचाºयांची फौज विमानतळावर तैनात करण्यात आली असून डोळ््यांत तेल घालून सुरक्षेवर लक्ष ठेवले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सुरक्षेच्या बाबतीत कोणताही धोका उद्भवू नये यासाठी अधिकारी व जवानांना सातत्याने विविध प्रकारचे अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जात आहे. या सर्व उपाययोजना आखताना सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी अधिकाºयांना व जवानांना त्यांच्याशी सौहार्दाने वागण्याचेही खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. अतिशय संवेदनशील विमानतळ असल्याने विमान अपहरण, प्रवाशांना ओलीस ठेवणे असे प्रकार घडण्याची भीती नेहमी असते. त्यामुळे असे घडू दिले जाणार नाही, यावर सीआयएसएफचे नेहमी लक्ष असते. विमान अपहरण व प्रवाशांना ओलीस ठेवण्याचे प्रकार रोखण्यासाठी सुरक्षा तपासणी व इतर बाबींमध्ये नेहमीपेक्षा जास्त दक्षता घेतली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुंबई विमानतळावरून दररोज एक लाख ४० हजार प्रवासी प्रवास करतात. गेल्या १० वर्षात मुंबई विमानतळÞावरून प्रवास करणाºया प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली. मुंबई विमानतळावरून वर्षभरात ४८ कोटी ५० लाख प्रवाशांनी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. एका वेळी केवळ एकच धावपट्टी वापरात असलेल्या या विमानतळावर दर तासाला ५२ विमानांचे वाहतूक व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे सर्वार्थाने व्यस्त असलेल्या या विमानतळावरील प्रवाशांची तपासणी करून सुरक्षा व्यवस्था अबाधित ठेवणे हे एक दिव्यच आहे. या खडतर कामगिरीत २४ तास सातत्य राखल्याने जागतिक पातळीवर सर्वात उत्तम सुरक्षा पुरवण्याचा पुरस्कार यापूर्वी मिळाला आहे. त्यामुळे ती गुणवत्ता टिकवण्यावर भर दिला जात असल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले.

सामाजिक उत्तरदायित्वही महत्त्वाचे

१० मार्च १९६९ ला स्थापना करण्यात आलेल्या सीआयएसएफ ने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. याबाबत अधिक माहिती देताना, सीआयएसएफचे उपमहानिरीक्षक व मुंबई विमानतळाचे मुख्य विमानतळ सुरक्षा अधिकारी (कासो) के. एन. त्रिपाठी म्हणाले, या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत.

आम्ही मुंबईतील विविध झोपडपट्ट्यांत स्वच्छता मोहीम राबवली आहे. १७५ हून अधिक कर्मचाºयांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारीतही तत्पर असल्याचे सिध्द केले. पुढील काळात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन पथनाट्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे.
मुंबईत विविध ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जाईल. सामाजिक सुरक्षा, सामाजिक उत्तरदायित्व महत्त्वाचे असल्याने आम्ही हे कार्यक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: 'Target' Mumbai Airport, CISF's focus on high security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.