मुंबई : टाटा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त आर. व्यंकटरमन यांनी सायरस मिस्त्री यांच्याविरुद्ध दाखल बदनामीच्या दाव्याला शुक्रवारी सत्र न्यायालयाने स्थगिती दिली.
मिस्त्री आपल्यावर खोटे आरोप करत असल्याचा आरोप करत आर. व्यकंटरमन यांनी जूनमध्ये मिस्रींविरुद्ध ५०० कोटींचा दावा ठोकला. तो मुख्य दंडाधिकाºयांकडे दाखल केला. दंडाधिकाºयांना पुढील कारवाईस स्थगिती देत सत्र न्यायालयाने दाव्यासंबंधी कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश कनिष्ठ न्यायालयाला दिले.
‘टाटा सन्स’च्या अल्पसंख्याक भागधारकांचे अपील एनसीएलटीने दाखल केल्याची माहिती आर. व्यंकटरमन यांनी लपवून ठेवली आहे. या अपिलात ‘टाटा सन्स’च्या गैरकारभाराचा उल्लेख केला आहे, असा युक्तिवाद मिस्त्रींतर्फे ज्येष्ठ वकील आबाद पौडा यांनी केला. त्यावर अतिरिक्त मुख्य दंडाधिकाºयांनी मिस्त्री व अन्य जणांना समन्स बजावत पुढील सुनावणी ११ सप्टेंबरला ठेवली.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.